21.7 C
New York

Malaika Arora Father Death : अभिनेत्री मलायका अरोराच्या वडिलांची आत्महत्या; कलाविश्वात खळबळ

Published:

अभिनेत्री मलायका अरोराशी (Malaika Arora ) संबंधित दु:खद बातमी येत आहे. खरंतर अभिनेत्रीच्या वडिलांनी या जगाचा निरोप घेतला आहे. मलायका अरोराच्या (Malaika Arora Father Death) वडिलांनी वांद्रे येथील घराच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास घडल्याचे सांगण्यात येत आहे. वडिलांनी टोकाचे पाऊल उचल्याची माहिती मिळाली तेव्हा मलायका पुण्यामध्ये होती. माहिती मिळताच ती तत्काळ मुंबईकडे रवाना झाली आहे. 

Malaika Arora Father Death अरबाज खान मलायकाच्या घरी पोहोचला

ही बातमी कळताच मलायका अरोराचा माजी पती अरबाज खान अभिनेत्रीच्या घरी पोहोचला आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मलायका अरोराच्या वडिलांनी सहाव्या मजल्यावरून गॅलरीतून उडी मारून आत्महत्या केली आहे. वांद्रे पोलीस आणि गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी पोहोचले असून, सध्या पोलिसांना घटनास्थळावरून कोणतीही सुसाईड नोट सापडलेली नाही. मलायकाचे वडील काही दिवसांपासून आजारी असल्याचे सांगण्यात येत आहे.

विनेशला टक्कर देणारे बैरागी पक्के राजकारणी; भाजपने टाकलाय नवा डाव

मलायका अरोराचे वडील अनिल अरोरा हे पंजाबी हिंदू कुटुंबातील होते. त्यांचे कुटुंब भारताच्या सीमेवर वसलेल्या फाजिल्का येथील रहिवासी होते. अनिल अरोरा यांनी इंडियन मर्चंट नेव्हीमध्ये काम केले होते. अनिल अरोरा यांनी मल्याळी ख्रिश्चन कुटुंबातील जॉयस पॉलीकार्पशी लग्न केले. मलायका 11 वर्षांची असताना अनिल अरोरा आणि जॉयस यांचा घटस्फोट झाला असल्याचे मलायकाने आपल्या एका मुलाखतीत सांगितले होते.

Malaika Arora Father Death मलायका अरोरा पुण्याहून मुंबईसाठी रवाना…

अभिनेत्री मलायका अरोरा ही काही कामानिमित्ताने पुण्यात होती. या घटनेची माहिती मिळताच मलायका तातडीने मुंबईसाठी रवाना झाली. या घटनेची माहिती मिळताच अरोरा कुटुंबातील सदस्यांना धीर देण्यासाठी मलायकाचा पूर्व पती आणि अभिनेता अरबाज खान हा अरोरा यांच्या घरी दाखल झाला.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img