19.1 C
New York

Hit And Run : अपघातावेळी बावनकुळेंचा मुलगा कुठे होता?; पोलिसांनी सांगितलं नेमकं काय घडलं..

Published:

नागपूरमध्ये एका ऑडी कारने काल (Nagpur News) मध्यरात्री शहरात पाच दुचाकी आणि चारचाकी वाहनांना धडक (Hit And Run) दिली. यामध्ये दोघं जखमी झाले तर वाहनांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. नागपूरच्या रामदासपेठ परिसरात ही घटना घडली. याप्रकरणी सीताबर्डी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. विशेष म्हणजे, या कारची नोंदणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांचा मुलगा संकेत यांच्या नावाने असल्याचे समोर आले होते. या अपघाताची राज्यभरात चर्चा होत असतानाच नागपूर पोलिसांनी पत्रकार परिषद घेत महत्वाची माहिती दिली. अपघातातील गाडी ही संकेत बावनकुळे यांच्या नावावर आहे, ते त्या गाडीचे मालक आहेत. कारमध्ये तीन लोक होते. त्यात संकेत बावनकुळे हेही होते, अशी माहिती नागपूर झोन दोनचे डीसीपी राहुल मदने यांनी दिली.

संकेत बावनकुळे गाडीत होता, तो वाहन चालवणाऱ्या चालकाच्या बाजूला बसला होता. कारमधील अर्जुन आणि रोनित दोघांची वैद्यकीय चाचणी केली आहे. दोघेही मद्य प्राशन करून होते. गाडी जेव्हा जप्त केली तेव्हा नंबर प्लेट होती. या अपघातात कुणीही गंभीर जखमी झालेले नाही. संकेत बावनकुळे यांना चौकशीसाठी बोलवले होते आणि त्याने कबूल केले होते की ते त्या गाडीत होते. आमच्यावर कोणताही राजकीय दबाव नाही. आम्ही जी कायदेशीर प्रक्रिया आहे ती पूर्ण करत आहोत.

सीसीटीव्ही फुटेज डिलीट केल्याचा आरोप होत आहे. पण यात तथ्य नाही. सीसीटीव्ही डिलीट केलेले नाहीत. असे कुठेही आढळलेले नाही. हे कुठून येत होते याचा तपास केली असून ते लाहोरी हॉटेल येथून येत होते. या अपघातात तीन गाड्यांचे नुकसान झाले आहे. यात दोन कार व एक दुचाकीचा समावेश आहे. त्या रात्री दोघांना पकडले त्यांची मेडीकल झाली आहे पण संकेत बावनकुळे त्या गाडीत होते हे उशीरा समजल्याने त्यांची चौकशी सुरू आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

बावनकुळे यांचा मुलगा संकेतच्या ‘ऑडी’ने दिली ५ वाहनांना धडक

Hit And Run  काँग्रेसकडून व्हिडिओ पोस्ट

पोलिसांच्या माहितीनुसार, संकेत यांची मोटार त्यांचा चालक अर्जुन हावरे (२४) आणि रोनित चिंतमवार (२७) यांना चालवायला दिली होती. याच कारने पाच वाहनांना धडक दिली. अपघातग्रस्त जितेंद्र सोनटक्के (४०) यांनी दिलेल्या तक्रारीवरून सीताबर्डी पोलिसांनी चालक हावरे आणि चिंतमवार यांना अटक केली. पोलिसांनी मोटार जप्त करून पोलीस ठाण्यात आणली. त्यावेळी तिची ‘नंबर प्लेट’ काढण्यात आल्याचं उघड झालं. कार कुणाच्या नावावर आहे, याची माहिती वाहतूक कार्यालयाकडून मागविल्याचं पोलीस अधिकारी चंद्रशेखर चकाटे यांनी सांगितलं आहे. दरम्यान महाराष्ट्र काँग्रेसने एक्सवर या अपघाताचा व्हिडिओ शेअर करत महाराष्ट्राच्या गृह खात्याला अनेक प्रश्न विचारले आहेत.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img