19.1 C
New York

Mumbai News : स्वामी विवेकानंद स्मृती दिनाचे आयोजन

Published:

मुंबई / रमेश औताडे

स्वामी विवेकानंद यांनी अमेरिकेत शिकागो मध्ये जे ऐतिहासिक (Mumbai News) भाषण केले त्याला १३१ वर्ष झाली. या पार्श्वभूमीवर स्वातंत्रवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक मुंबई येथे ” राष्ट्रकवी रामधारी सिंह दिनकर स्मृती न्यास ” संस्थेने राष्ट्रप्रेम उत्सव चे आयोजन केले असल्याची माहिती न्यास चे अध्यक्ष नीरज कुमार यांनी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

११ सप्टेंबर रोजी होत असलेल्या या राष्ट्रप्रेम उत्सवामध्ये युवकांच्या भविष्यावर परिसंवाद, स्वामी विवेकानंद यांच्या कार्याचे चित्र प्रदर्शन, देव धर्म या पेक्षा देश मोठा आहे या विषयावर भव्य नाटक, राष्ट्रीय परिसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी पत्रकार परिषदेस केंद्रीय राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे, मनजीत सिंग,कुमार सुशांत, रोशन सिंग उपस्थित होते.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img