21.7 C
New York

Sachin Tendulkar : पराभूत सामन्यांतील हिट फलंदाज; सचिननंतर टीम इंडियाच्या ‘या’ खेळाडूचा नंबर

Published:

मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरने क्रिकेटमध्ये (Sachin Tendulkar) भारतीय संघासाठी सर्वाधिक धावा केल्या आहेत. निवृत्त झाल्यानंतरही त्याचे अनेक विक्रम अजूनही कायम आहेत. आताच्या फलंदाजांना या विक्रमांची बरोबरी करणे किंवा हे विक्रम तोडून नवीन रेकॉर्ड करणे कठीण ठरत आहे. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा असा (Rohit Sharma) एक फलंदाज आहे ज्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये तीन (ODI) वेळा द्विशतक केले आहे. असा विक्रम करणारा तो एकमेव भारतीय खेळाडू आहे. या दोन्ही खेळाडूंच्या नावावर अनेक विक्रम नोंदले गेले आहेत. परंतु, ज्या सामन्यांमध्ये भारताचा पराभव झाला होता त्या सामन्यात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांत सचिन अव्वल आहे. या यादीत रोहित शर्मा आणि शिखर धवन (Shikhar Dhawan) यांचाही समावेश आहे.

सन 2009 मध्ये सचिनने ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या (Australia) सामन्यात 175 धावा केल्या होत्या. तरीही या सामन्यात भारताचा पराभव झाला होता. या यादीत रोहित शर्माचं नाव दुसऱ्या क्रमांकावर येतं. रोहितने 2016 मध्ये ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या सामन्यात 171 धावा केल्या होत्या. तरीही या सामन्यात भारताचा पराभव झाला होता.

या यादीत तिसऱ्या क्रमांकावर पुन्हा रोहित शर्माच आहे. सन 2015 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात (South Africa) रोहितने 150 धावा केल्या होत्या. त्याच्या या शानदार खेळीनंतरही भारताला सामना काही जिंकता आला नव्हता. या यादीत चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर पुन्हा सचिन तेंडुलकर आहे. सन 2000 मध्ये झिम्बाब्वे (Zimbabwe) विरुद्ध 146 आणि 1998 मध्ये ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या सामन्यात 143 धावा केल्या होत्या. तरीही भारताला विजय मिळवता आला नव्हता.

या यादीत सहाव्या क्रमांकावर क्रिकेटमधून नुकतीच निवृत्ती घेतलेला क्रिकेटर शिखर धवन आहे. सन 2019 मध्ये ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या सामन्यात (IND vs AUS) शिखरने 143 धावा केल्या होत्या. त्याची खेळी मात्र व्यर्थ गेली. हा सामना ऑस्ट्रेलियानेच जिंकला होता.

Sachin Tendulkar पराभूत सामन्यांतील हिट फलंदाज

175 – सचिन तेंडुलकर वि. ऑस्ट्रेलिया (2009)
171 – रोहित शर्मा वि. ऑस्ट्रेलिया (2016)
150 – रोहित शर्मा वि. दक्षिण आफ्रिका (2015)
146 – सचिन तेंडुलकर वि. झिम्बाब्वे (2000)
143 – सचिन तेंडुलकर वि. ऑस्ट्रेलिया (1998)
143 – शिखर धवन वि. ऑस्ट्रेलिया (2019)

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img