13.2 C
New York

Assembly Election : लोकसभेचीच पुनरावृत्ती! महायुतीला धोबीपछाड, महाविकास आघाडी सुसाट

Published:

देशात काही दिवसांपूर्वीच लोकसभा निवडणुका (Loksabha Election) पार पडल्या. या निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळालंय तर महायुतीला अपेक्षित जागा मिळाल्या नाहीत. लोकसभेनंतर आता विधानसभेच्या (Assembly Election) तयारीला वेग आलायं. सर्वच पक्षांकडून कंबर कसलेली असतानाच एका सर्व्हेमधून विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात महाविकास आघाडी सुसाट तर महायुतीला धोबीपछाड मिळणार असल्याची शक्यता आहे. लोकं पोलने केलेल्या सर्व्हेक्षणाचा अहवाल समोर आलायं. लोकसभेला मतदारांनी महाविकास आघाडीला पसंती दिलीयं तर महायुतीला दे धक्का दिल्याचं दिसून आलं होतं, त्याची पुनरावृत्ती आता विधानसभेलाही होणार असल्याची शक्यता आहे.

विधानसभेच्या राज्यात एकूण 288 जागा आहेत, त्यापैकी बहुमत सिद्ध करण्यासाठी 145 जागांची आवश्यकता आहे. त्यापैकी सध्या भाजपकडे 102 तर शिंदे गटाकडे 40 आणि अजित पवार गटाकडे 42 जागा आहेत. लोक पोलच्या सर्व्हेनूसार यंदा विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या पदरात 141 ते 154 जागा पडणार असल्याचा अंदाज सांगण्यात येत आहे. तर महायुतीला 115 ते 128 जागा मिळण्याची शक्यता आहे. महायुतीला 38 ते 41 टक्के तर महाविकास आघाडीला 41 ते 44 टक्के मिळण्याची शक्यता असल्याचं सांगण्यात आलंय. तर इतर अपक्षांना 5 ते 18 जागा मिळणार असल्याचा अंदाज आहे.

Assembly Election विदर्भात मविआचा वरचष्मा :

लोक पोलच्या अहवालानूसार विदर्भात महाविकास आघाडीला 40 ते 45 जागा मिळणार असल्याचा अंदाज आहे. तर महायुतीला 15 ते 20 जागांवरच समाधान मानावं लागणार आहे. खानदेशात महाविकास आघाडी आणि महायुतीला समसमान जागा मिळण्याचा अंदाज वर्तवला आहे.

खुद्द फडणवीसही रोहित पवारांवर खुश; ह्रदय मोठंय म्हणत मानले आभार

Assembly Election ठाणे-कोकण महायुतीच…

ठाण्यासह कोकण पट्ट्यामध्ये महायुतीचं वर्चस्व असल्याचं चित्र आहे. या पट्ट्यांत महायुतीला 25 ते 30 जागा मिळतील तर महाविकास आघाडीच्या पदरात फक्त 5 ते 10 जागा मिळणार असल्याचा दावा अहवालातून करण्यात आलायं.

Assembly Election मुंबई-पश्चिम महाराष्ट्रात मविआचा झेंडा..

महाविकास आघाडीतील घटक पक्ष उद्धव ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीसाठी मुंबईवर चांगलाच फोकस केलायं, त्यामुळे मुंबईत महाविकास आघाडीला 25 ते 25 जागा मिळू शकतात, तर महायुतीला 10 ते 15 जागा मिळू शकतील, असा अंदाज पोलमध्ये वर्तवण्यात येत आहे. तर पश्चिम महाराष्ट्रात महाविकास आघाडीला भरघोस म्हणजेच 30 ते 35 जागा पारड्यात मिळू शकतात, आणि महायुतीला अवघ्या 20 ते 25 जागांच मिळू शकतील, असंही सांगण्यात येत आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img