21.7 C
New York

Bigg Boss Marathi : ‘संग्रामने पहिल्याच दिवशी घेतलाय निक्कीसोबत पंगा

Published:

‘बिग बॉस मराठी’च्या (Bigg Boss Marathi) घरात आज संग्राम चौगुलेची (Sangram Chougule) एन्ट्री झाली आहे. त्याला घरातल्या पहिल्या दिवसापासूनच अनेक आव्हानांचा सामना करावा लागणार आहे. (Bigg Boss Marathi Season 5) त्याचा पहिला दिवसच टास्कपासून सुरू होणार आहे. पहिल्याच दिवशी (Bigg Boss Marathi Season) टास्कमध्ये सदस्यांसोबत वाद घालताना संग्राम दिसून येईल. ‘बिग बॉस मराठी’च्या घरात आज जादुई विहिरीत कोण पडणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

‘बिग बॉस मराठी’च्या नव्या प्रोमोमध्ये बिग बॉस म्हणत आहेत, “या जादुई विहिरीत असे काही सदस्य पडतील जे अपात्र आहेत”. त्यानंतर संग्राम जादुई विहिरीत निक्कीला पडायला सांगतो. पण मेडिकल कंडिशनचं कारण देत निक्की (Nikki Tamboli) विहिरीत पडायला नकार देते. दरम्यान संग्राम निक्कीला जादुई विहिरीत ढकलतो. संग्रामने घरात आल्या आल्या निक्कीसोबत घेतलेला पंगा नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेईल.

Bigg Boss Marathi ‘हा’ ग्रुप अंकिता अन् डीपी दादांवर घालणार पहिला घाव

अंकिता डीपी दादांना म्हणतेय,”डीपी दादा तुम्ही नॉमिनेशनमध्ये होतात तेव्हा एक वाक्य बोलला होतात विश्वासाबद्दल. मला पलटणारी लोक आवडत नाहीत. मी जेव्हा घरातून जाणार होते तेव्हा मी अभिजीतला म्हणाले होते, “स्टँड घे.. पलटू नको”. त्यावर डीपी दादा म्हणतात,”हा ग्रुप सगळ्यात पहिला घाव तुझ्यावर आणि माझ्यावर घालणार आहे.

Bigg Boss Marathi संग्रामने अरबाजला दिली फुल ऑन धमकी

‘बिग बॉस मराठी’च्या नव्या प्रोमोमध्ये (Bigg Boss Marathi New Promo) संग्राम आपल्या नावाची पाटी घेत घरात एन्ट्री करताना दिसत आहे. छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जय अशी घोषणा देत संग्रामने घरात एन्ट्री घेतली आहे. घरात येताच संग्रामने अरबाजने फुल ऑन धमकी दिली आहे.

‘बिग बॉस मराठी’च्या घरामध्ये झाली सीझनची पहिली वाईल्ड कार्ड एन्ट्री म्हणजेच संग्राम चौगुले. आता नव्या सदस्याच्या येण्याने घरातील समीकरण किती बदलतील ? नात्यांमध्ये काय बदल होतील ? कोण घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेत येईल आणि कोण सेफ होईल ? म्हणजेच येणारा आठवडा खूप आव्हाात्मक आणि उत्कंठावर्धक असणार यात शंका नाही.

कोण आहे संग्राम चौगुले?

बॉडीबिल्डर संग्राम चौगुले सोशल मीडियावर चांगलाच सक्रीय आहे. त्याने दीड मिलियन फॉलोअर्स आहेत. फिटनेसवर त्याने प्रचंड मेहनत घेतलेली आहे. आजवर त्याने अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय बॉडीबिल्डिंग स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे. त्याने सहा वेळा मिस्टर इंडिया आणि पाच वेळा मिस्टर महाराष्ट्राच्या किताबावर आपले नाव कोरले आहे. त्याची स्वत:ची एक आलिशान जीमदेखील आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img