बांगलादेशविरुद्ध 19 सप्टेंबरपासून सुरु होणाऱ्या पहिल्या कसोटीसाठी (IND VS BAN) बीसीसीआयकडून (BCCI) भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. भारतीय संघात पहिल्यादा यश दयालची (Yash Dayal) बीसीसीआयकडून निवड करण्यात आली आहे. बांगलादेशविरुद्ध 2 सामन्यांची कसोटी मालिका 19 सप्टेंबरपासून खेळवली जाणार आहे. पहिला कसोटी सामना चेन्नईत होणार आहे. आज या सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे.
रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली या संघात पहिल्यांदा वेगवान गोलंदाज यश दयालला संधी मिळाली आहे तर यष्टिरक्षक म्हणून ऋषभ पंत परतला आहे. याच बरोबर या संघात अतिरिक्त यष्टीरक्षक म्हणून ध्रुव जुरेलची निवड करण्यात आली आहे. इंग्लंडविरुद्ध दमदार कामगिरी करणाऱ्या सरफराज खानचा देखील समावेश या संघात करण्यात आला आहे. याच बरोबर केएल राहुलला देखील संघात स्थान देण्यात आले आहे.
तर वेगवान गोलंदाजी जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि आकाशदीपसह यश दयालला संघात स्थान देण्यात आले आहे. आकाशदीपने दुलीप ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यात 9 विकेट घेत बांगलादेशविरुद्ध होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी आपले स्थान पक्के केले आहे. तर फिरकी गोलंदाजीत रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल आणि कुलदीप यादवचा समावेश करण्यात आला आहे.
IND VS BAN बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सरफराज खान, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाशदीप, जसप्रीत बुमराह, यश दयाल