19.1 C
New York

Manoj Jarange : आरक्षण दिलं नाहीतर 113 आमदार पाडणारच, जरांगेंचा फडणवीसांना इशारा

Published:

गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha reservation) मुद्दा पेटला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी ओबीसी (OBC) समाजातून आरक्षण देण्याची मागणी केली. मात्र, अद्याप ही मागणी पूर्ण झाली नाही. त्यामुळं जरांगे पाटील सातत्याने सरकावर टीका करत आहे. आजही जरांगेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह (Devendra Fadnavis)भाजपवर (BJP) जोरदार टीका केली.

मराठा आरक्षण जनजागृती निमित्त आज जरांगे पाटील परळी वैजनाथ येथे आले होते. यावेळी बोलतांना त्यांनी जरांगेंनी फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली. जरांगे म्हणाले की, देवेंद्र फडणवीसांनी ट्रॅप लावला आहे. त्यांनी मराठ्यांचे आमदार मराठ्यांच्याच विरोधात घातले. रोज एक आमदार आमच्या विरोधात बोलत आहे. मात्र हा ट्रॅप रचण्यापेक्षा फडणवीस यांनी गरीब मराठ्यांना आरक्षण द्यावं. पण तुम्ही आरक्षणाला विरोध करू नका. फडणवीसांनी त्यांच्या लोकांना आवरावं, असं जरांगे म्हणाले.

Manoj Jarange तुमचे 113 आमदार पाडल्याशिवाय राहणार नाही

पुढं ते म्हणाले, तुमची श्रीमंती मराठ्यांसमोर टिकणार नाही. रावणाकडेही श्रीमंती होती, पण तीही टिकू शकली नाही. मराठ्यांसमोर तुमची सत्ता टिकूच शकणार नाही. मराठ्यांच्या आरक्षणाच्या विरोधात येऊ नका. तुम्हाला सुट्टी मिळणार नाही. मला आणि माझ्या समाजाला राजकारणात यायचं नाही. आमचं आरक्षण आम्हाला द्या.. मात्र आम्हाला आमचं आरक्षण न दिल्यास पुन्हा एकदा सांगतो, तुमचे 113 आमदार पाडल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा जरांगेंनी दिली. जरांगे म्हणाले की, मला माझ्या समाजापुढे काही दिसत नाही. तुम्ही तुमच्या जातीसाठी कट्टर आहात, तर मी का असू नये? मला माझ्या समाजाचा अभिमान आहे. मला आंदोलन करण्यापासून रोखणारे तुम्ही कोण? या सत्तेसाठी आणि या राजकारण्यांसाठी मी का पाऊल माघे घेऊ? मी मराठा आरक्षण घेऊनच राहणार, असा निर्धार जरांगेंनी केला.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img