19.1 C
New York

Amit Shah : धुसफूस चव्हाट्यावर येऊ देऊ नका; शाहंच्या महायुतीतील नेत्यांना कडक सूचना

Published:

महायुतीतील धुसफूस चव्हाट्यावर येऊ नये, जाहीर वाद टाळावेत, अशा कडक सूचना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी रविवारी (दि.8) महायुतीच्या (Mahayuti) नेत्यांना केल्या आहेत. लोकसभा निवडणुकीत झालेल्या ज्या चुकांमुळे अपयश आले, त्या टाळण्याच्या सूचना शहा यांनी केल्याचे सूत्रांनी सांगितले. शहा यांच्या अध्यतेखाली सह्याद्री अतिथीगृहावर बैठक पार पडली. त्यावेळी शाहंनी वरील सूचना केल्या आहेत. (Amit Shah On Maharashtra Vidhan Sabha Election)

Amit Shah महायुतीतील नेत्यांनी संयम ठेवावा

सह्याद्री अतिथीगृहावर पार पडलेल्या बैठकीत शाहंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर महत्वाच्या बाबींवर चर्चा केली. यावेळी त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या नेत्यांनी संयम ठेवावा आणि एकजूट असल्याचे चित्र जनतेसमोर जाईल, याची काळजी घ्यावी असे शाहंनी सांगितले आहे.

आरक्षण दिलं नाहीतर 113 आमदार पाडणारच, जरांगेंचा फडणवीसांना इशारा

Amit Shah जिंकून येणारे उमेदवार निश्चत करा

शाहंनी मार्गदर्शन करताना काही निकषांच्या आधारे जागावाटप करण्याच्या आणि जिंकून येण्याची क्षमता असलेले योग्य उमेदवार निश्चित करण्याच्या सूचनाही शाह यांनी दिल्या आहेत. मराठवाड्यासह काही भागात मराठा आरक्षणाचा भाजपला मोठा फटका बसला. संविधान बदलाची चर्चा, कांदा निर्यातबंदीसह काही बाबींमुळे लोकसभा निवडणुकीत पराभव झाला. विधानसभा निवडणुकीत या बाबींकडे काटेकोरपणे लक्ष देण्याबाबत बैठकीत चर्चा झाल्याचेही सांगितले जात आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img