गेल्या दोन आठवड्यांपासून राज्यात पावसाने काही ठिकाणी दडी (Weather Update) मारल्याचे चित्र होते. मात्र, गेल्या तीन दिवसांपासून मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी पावसाने पुन्हा हजेरी लावल्याचे दिसून आले. तसेच, सोमवारपासुन राज्यात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. राज्यात कोकणसह विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये सोमवारी (9 सप्टेंबर) मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. राज्यात अनेक ठिकाणी पावसासाठी पोषक वातावरण बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र जास्तच तीव्र झाल्याचा परिणाम म्हणून तयार झाले आहे.
हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तविले आहे. तर राज्याच्या कमाल आणि किमान तापमानातही चढउतार होण्याची शक्यता आहे. दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून विदर्भासह मराठवाड्यामध्ये पावसाने हजेरी लावलेली आहे. अतिवृष्टीमुळे अनेक पिके पाण्यात वाहून गेली असून शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. सोमवारपासूनचे पुढचे आणखी काही दिवस राज्याच्या जवळपास सर्वच भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
आरक्षण दिलं नाहीतर 113 आमदार पाडणारच, जरांगेंचा फडणवीसांना इशारा
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, किनारपट्टी परिसरात पावसाची तीव्रता वाढणार आहे. तसेच, घाटांवरही येत्या 3 दिवसांमध्ये चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे. तसेच, मध्य महाराष्ट्रामधील जिल्ह्यांत घाट परिसरामध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार आहे. सोमवारी कोकणातील पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तर, मध्य महाराष्ट्राच्या नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांत पावसाच्या सरी कोसळणार आहेत. विदर्भातील बुलढाणा, अकोला, वाशीम, अमरावती, वर्धा, यवतमाळ, नागपूर, भंडारा या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच, उत्तर महाराष्ट्रामधील धुळे, जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यात तुरळक पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.