21.7 C
New York

Big Boss Marathi : शिवरायांचा जयघोष करत संग्राम चौगुलेची बिग बॉसच्या घरात एन्ट्री!

Published:

Big Boss Marathi : गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वात यंदाची पहिली वाइल्ड एन्ट्री झालेली आहे. घरात वाइल्ड कार्ड म्हणून कोण एन्ट्री घेणार याबद्दल गेल्या सहा आठवड्यापासून चर्चा रंगली होती.अखेर आता प्रेक्षकांची प्रतीक्षा संपली असून, संग्राम चौगुले याने बिग बॉस मराठीच्या घरात वाइल्ड कार्ड एन्ट्री केली. यावेळी संग्राम चौगुले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच नाव घेत घरात प्रवेश केला. तसच संग्रामच्या एन्ट्रीवर चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे.

पाच वेळा ‘महाराष्ट्र श्री’ , सहा वेळा ठरलेला ‘मिस्टर इंडिया’ चा मानकरी ठरलेला संग्राम चौगुले याची बिग बॉस मराठीच्या घरात वाईल्ड कार्ड एन्ट्री झाली आहे. रितेश देशमुखने ‘भाऊचा धक्का’वर शोचा होस्ट करताना संग्रामाचे स्वागत केले. आता संग्राम बिग बॉसच्या घरात प्रवेश करणार त्यामुळे आता घरातील समीकरणात काय बदल होतील, याकडेही प्रेक्षकांच्या नजरा खिळल्या आहेत.

कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांच्या वेतनात भरघोस वाढ, फडणवीसांची मोठी घोषणा

कोण आहे संग्राम चौगुले?

संग्राम चौगुले हा मुळचा कोल्हापूरचा शरीरसौष्ठवपटू असून सध्या तो पुण्यात स्थायिक आहे.सहा वेळा ‘मिस्टर इंडिया’ तर 2012 आणि 2014 या असे दोन वेळा ‘मिस्टर युनिव्हर्स’ होण्याचा मान संग्रामने मिळवला होता. आपलं नशीब संग्रामने अभिनय क्षेत्रातही आजमावलं आहे. ‘दंभ’ या चित्रपटातून संग्राम हा 2016 साली मराठी रुपेरी पडद्यावर झळकला होता.

त्यानंतर ‘आला माझ्या राशीला’ यामध्ये संग्रामने पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती. संग्रामचे इन्स्टाग्रामवर 1.5 मिलियन्स फॉलोअर्स असून सोशल मीडियावरील इतर प्लॅटफॉर्मवरही त्याचे चाहते आहेत. सोशल मीडियावर संग्रामचे वर्कआउट करतानाचे व्हिडीओ चांगलेच व्हायरल होत आहेत. त्यामुळे आता बिग बॉस मराठीच्या घरात काय संग्राम चौगुले काय धमाल करतो हे पाहणं महत्वाच ठरणार आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img