19.1 C
New York

Deepika Padukone : मुलगी झाली रे…दिपवीरच्या घरी चिमुकलीचे आगमन

Published:

बॉलिवूडमधील सेलिब्रिटी कपल रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण (Deepika Padukone) आईबाबा झाले आहेत. रणवीर-दीपिकाच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. दीपिकाने गोंडस बाळाला जन्म दिला आहे. बॉलिवूड इंडस्ट्रीतलं ग्लॅमरस कपल म्हणून ओळखले जाणारे दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह यांनी अखेर गोड बातमी दिली आहे. अभिनेत्री दीपिका पादुकोणनने मुलीला जन्म दिला. पापारराझी अकाउंटवरुन ही बातमी समोर आली आहे.

आजच दीपिका मुंबईतल्या आर एन रिलायन्स हॉस्पिटलमध्ये अॅडमिट झाली होती. त्यानंतर रणवीरचे कुटुंबिय देखील हॉस्पिटमध्ये आले होते. तर काल त्यांनी कुटुंबासह सिद्धिविनायकाचं दर्शनही घेतलं होतं. दीपिका जेव्हा जेव्हा कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात दिसायची तेव्हा तिच्या प्रेग्नंसी लूकची बरीच चर्चा व्हायची. तिचे वेगवेगळ्या आऊटफिटमधले लूक खूप व्हायरल झालेले. याशिवाय ती दीपिका गरोदरपणाच्या काळात बरेचदा आपल्या माहेरच्या आणि सासरच्या मंडळींसोबत वेळ घालवताना दिसलेली. रणवीरही तिची बरीच काळजी घेत होता.

कंगनाच्या ‘इमर्जन्सी’ला ग्रीन सिग्नल

दीपिका रणवीरनं ही पोस्ट शेअर करताच अनेक सेलिब्रेटींनीही त्यांना व त्याच्या नवजात बाळाला शुभेच्छा दिल्या आहेत. दीपिकाच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास ती शेवटची कल्की 2898 एडी या सिनेमात दिसलेली. तर रणवीर शेवटचा रॉकी और रानी की प्रेम कहानी या सिनेमात दिसलेला. आता लवकरच दीपिका आणि रणवीर सिंघम ३ मध्ये एकत्र दिसणार आहेत.

फेब्रुवारी महिन्यात प्रेग्नंसी जाहीर केल्यापासून दीपिका तिच्या विविध प्रोजेक्ट्समध्येही सक्रिय आहे. गरोदरपणात तिने ‘कल्की 2898 एडी’ या चित्रपटाचं प्रमोशनसुद्धा केलं होतं. त्याचप्रमाणे आपल्या सौंदर्यप्रसाधनाच्या प्रॉडक्ट्सची जाहिरातसुद्धा ती करत होती. इतकंच नव्हे तर गरोदरपणात ती काय खात होती आणि कोणत्या प्रकारचा व्यायाम करत होती, याविषयी तिने सोशल मीडियाद्वारे चाहत्यांन सांगितलं होतं.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img