21.7 C
New York

Kangana Ranaut : कंगनाच्या ‘इमर्जन्सी’ला ग्रीन सिग्नल

Published:

बॉलिवूड अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना राणावतचा (Kangana Ranaut) इमर्जन्सी चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. या वादामुळे चित्रपट शुक्रवारी (Emergency Movie Release) रिलीज झाला नाही. या चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले. सेन्सर बोर्डानेही या चित्रपटातील काही सीन्सना कात्री लावली. आता कंगनाला या प्रकरणी दिलासा मिळाला आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनने (CBFC) तीन कट आणि एकूण 10 बदलांसह चित्रपटाला ‘UA’ सर्टिफिकेट देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे कंगनाच्या या चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग आता मोकळा झाला आहे.

सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनने वादग्रस्त अशा ऐतिहासिक वक्तव्यांसंदर्भात चित्रपटाच्या निर्मात्यांकडे पुरावे मागितले आहेत. तसेच चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी काही अटी ठेवल्या. यामध्ये तीन प्रकारचे मजकूर काढून टाकण्याची अट सेन्सॉर बोर्डाने ठेवली. अमेरिकेचे माजी राष्ट्रपती रिचर्ड निक्सन यांनी भारतीय महिलांबाबत केलेले अपमानजनक वक्तव्य तसेच इंग्लंडचे माजी पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांचे वादग्रस्त वक्तव्यांचा यामध्ये समावेश आहे. बोर्डाने या वक्तव्यांचे पुरावे चित्रपट निर्मात्यांकडे मागितले आहेत.

निवडणुकीनंतर जम्मू काश्मीरला राज्याचा दर्जा; गृहमंत्री अमित शाह यांचं मोठं विधान

कंगनाचा चित्रपट याआधी 6 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार होता. मात्र सेन्सॉर बोर्डाच्या परवानगीशिवाय चित्रपट प्रदर्शित करता येणार नव्हता. त्यामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली होती. आता सेन्सॉर बोर्डाने चित्रपटाला UA सर्टिफिकेट दिले आहे. त्याामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img