21.7 C
New York

MVA : महाविकास आघाडीत चौथा भिडू? एमआयएमकडून प्रस्तावाबरोबर अल्टिमेटमही…

Published:

लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात आता विधानसभा निवडणुकीचं (Assembly Election 2024) वारं वाहु लागलंय. सर्वच पक्षांकडून जागावाटपाच्या मुद्द्यावरुन मॅरेथॉन बैठका सुरु असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. अशातच आता महाविकास आघाडीमध्ये (MVA) चौथा भिडू सामिल होणार असल्याची शक्यता आहे. एमआयएमकडून (MIM) महाविकास आघाडीला युतीसाठी खुली ऑफर देण्यात आलीयं. त्यामुळे आता महाविकास आघाडीत चौथा भिडू सामिल होणार असल्याचं बोललं जात आहे. एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीला युतीबाबतचा प्रस्ताव दिलायं तर सप्टेंबरच्या मध्यापर्यंत निर्णय न झाल्यास स्वबळावर लढणार असल्याचाही इशारा जलील यांनी दिलायं.

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीमध्ये अजित पवार गट, भाजप आणि शिंदे गट सामिल आहेत. राज्यात पुन्हा महायुतीचंच सरकार आणण्यासाठी महायुतीच्या सर्वच घटक पक्षातील नेते प्रयत्नशील आहेत. तर दुसरीकडे लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळाल्यानंतर महाविकास आघाडीचे नेते विधानसभा निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी करीत आहे. त्यातच आता एमआयएमने खुली ऑफर दिल्यानंतर जर युती केल्यास महाविकास आघाडीला फायदा होणार असल्याचा दावा एमआयकडून करण्यात येत आहे.

मोठी बातमी! सीबीआयकडून पुण्यातील तत्कालीन पोलीस उपायुक्तांवर गुन्हा दाखल

एमआयएमचे जलील महाविकास आघाडीला ऑफर देताना म्हणाले, आमच्या आणि शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) विचारसरणीत मतभेद आहेत. तरीही राजकीय तडजोड म्हणून आम्ही शिवसेना (उबाठा) महाविकास आघाडीत असताना आघाडी करण्यास तयार आहोत. आम्हाला राज्यातील शेतकरी आणि लोकांचे हित महत्त्वाचे वाटते. ज्या ठिकाणी आमच्या पक्षाची स्थिती मजबूत आहे, त्या जागा आम्ही लढवणार, असा प्रस्ताव महाविकास आघाडीला दिला आहे. आता आम्हाला मविआकडून उत्तराची अपेक्षा असल्याचं जलील यांनी स्पष्ट केलंय.

MVA जागांबाबत अद्याप निश्चित नाही…

एमआयएम राज्यात किती जागा लढवणार, हे आम्ही अजून निश्चित केलेले नाही. आता आम्ही आढावा घेत आहोत. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत एमआयएमने 44 जागा लढवल्या होत्या. त्यापैकी दोन ठिकाणी पक्षाला यश मिळाले, असल्याचं जलील यांनी सांगितलंय.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img