13.2 C
New York

Manoj Jarange : फडणवीसांनी मारुन टाकलं तरीही; जरांगे पाटील असं का म्हणाले

Published:

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे आणि सत्ताधारी सरकारमध्ये चांगलीच खडाजंगी जुंपलीयं. मराठा आरक्षण आंदोलनावरुन भाजपचे आमदार प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी जरांगे यांच्यावर सडकून टीका केलीयं. मराठा समाज तुमची मालमत्ता आहे का? अशी टीका दरेकरांनी केली होती. या टीकेवर उत्तर देताना मनोज जरांगेंनी (Manoj Jarange) हा देवेंद्र फडणवीसांचाच ट्रॅप असल्याचा गंभीर आरोप केलायं. ज्यांना पक्ष वाढवायचायं, तेच आमदार आमदार आमच्याविरोधात बोलत आहेत, पण भाजपमधील काही आमदारांना फडणवीसांनी मारुन टाकलं तरीही ते विरोधात बोलू शकत नसल्याचं मनोज जरांगे यांनी स्पष्ट केलंय.

आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मनोज जरांगे यांच्याकडून सातत्याने देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करण्यात येत आहे. फडणवीस यांच्यावर टीका होत असल्याने फडणवीसांचे शिलेदार प्रविण दरेकर मैदानात उतरले आहेत. जरांगेंनी फडणवीसांवर टीका केल्यानंतर दरेकरांनीही मराठा समाज तुमची मालमत्ता आहे का? असा सवाल केला होता. त्यावर बोलताना मनोज जरांगे म्हणाले, “हा देवेंद्र फडणवीसांनी रचलेला ट्रॅप असून मोठे लोक जे बोलताहेत ना, त्यांना गरीब मराठा मोठा होऊ वाटत नाही. सगळ्या संघटना फोडल्या. काही समन्वयक फोडले. भाजपतील काही मराठा आमदार बोलायला लागले. ज्यांना गरीब मराठ्यांची गरज नाही, असाच भाजपमधील मराठा आमदार बोलायला लागला असल्याचं प्रत्युत्तर जरांगे यांनी दिलंय.

महाविकास आघाडीत चौथा भिडू? एमआयएमकडून प्रस्तावाबरोबर अल्टिमेटमही…

तसेच त्यांना त्यांची पोरं मोठी करायची आहेत. त्याला मालमत्ता कमावायची आहे. त्याला पक्ष मोठा करायचा आहे आणि नेता मोठा करायचा आहे, तेच आमदार आमच्या विरोधात बोलत आहेत. भाजपमधील काही आमदार मेले तरी बोलू शकत नाही. देवेंद्र फडणवीसांनी मारून टाकलं तरी बोलू शकत नाही. जातीच्या आणि आंदोलनाच्या विरोधात ते बोलूच शकत नसल्याचंही मनोज जरांगे यांनी स्पष्ट केलंय.

दरम्यान, अनेक आमदार मला भेटून गेले. समाजाचं कल्याण होत आहे. आमच्यावर दबाव असला तरी आम्ही बोलणार नाही. कारण गरिबाची लेकरं मोठी व्हायला लागली आहेत. ज्यांना स्वतःची प्रॉपर्टी सांभाळायची आहे. नेता, पक्ष सांभाळायचा आहे. जात मेली तरी चालेल, असेच लोक फक्त बोलत आहेत, असं मनोज जरांगेंनी सांगितलंय. तसेच आंदोलनाच्या विरोधात मराठा समाज उभा राहणार नाही, वेळ येऊ द्या मराठे तुम्हाला कसे सरळ करतात, बघा या शब्दांत जरांगे यांनी सत्ताधाऱ्यांना इशारा दिलायं.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img