13.2 C
New York

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिण’ योजनेबाबत महिला व बालविकास खात्याचा मोठा निर्णय

Published:

‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ (Ladki Bahin Yojana) सध्या चांगलीच चर्चेत आहे. महिला तासन् तास या योजनेचा लाभ घेण्यासाठी, त्याचा फॉर्म भरण्यासाठी रांगेत उभ्या राहिल्याचं चित्र महाराष्ट्रभर दिसलं. फॉर्म भरलेल्या पैकी काही महिलांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. तर काहींना हा लाभ मिळणं अद्याप बाकी आहे. असं असताना आता एक धक्कादायक बाब समोर आली आहे. या लाभार्थी महिलांचे पैसे कापले जात असल्याचं समोर आलं आहे. लाभार्थ्यी महिलांचे बँकेकडूनच पैसे कापले गेल्याचं उघडकीस आलं आहे. त्यानंतर महिला व बालविकास खात्याचा मोठा निर्णय घेतला आहे.

‘राज्यात सुरू असलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’वरून राजकीय वादाला अद्याप पूर्णविराम लागलेला नाही. त्यातच आता या योजनेबाबत येणाऱ्या तक्रारी सोडवण्यासाठी महिला व बालविकास मंत्रालय जोरकसपणे कामाला लागलं आहे. या योजनेतील अनेक लाभार्थ्यांचे पैसे बँकांकडून कापण्यात आल्याच्या अनेक तक्रारी समोर आल्या आहेत. याची दखल घेत महायुती सरकारने लवकरच बँकांशी चर्चा करण्याचं निश्चित केलं आहे. लाभार्थी महिलांचे पैसे कापू नयेत, यासाठी पत्रव्यवहार करण्याची तयारीही सुरू केल्याची माहिती मंत्रालयातील सूत्रांनी दिली.

‘उद्धव ठाकरे जितके भोळे तितकेच लबाड’, शिंदे गटाच्या नेत्याचा गौप्यस्फोट

Ladki Bahin Yojana नेमकं काय घडलं?

‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’ चा अनेक महिलांना लाभ झाला आहे. मात्र हा लाभ महिलांना मिळताना त्यातील काही पैसे कापले जात असल्याचं समोर आलं आहे. त्यानंतर महिला व बालविकास मंत्रालयाने मोठा निर्णय निर्णय घेतला आहे. महिला व बालविकास मंत्रालयाकडून महिला लाभार्थ्यांचे पैस कापले जाऊ नयेत, यासाठी बँकांशी संवाद साधला जाणार आहे. या बँकांशी पत्रव्यवहार करण्याची तयारीही महिला व बालविकास खात्याने सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Ladki Bahin Yojana ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ काय आहे?

राज्यातील महिलांना सक्षम करण्यासाठी राज्य सरकारने नवं धोरण आणलं आहे. ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ शिंदे सरकारने घोषित केली. या योजनेअंतर्गत आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्या लाभार्थी महिलांना दरमाह 1 हजार 500 रुपये दिले जाणार आहेत. याची सुरुवातही झाली आहे. पहिल्या टप्प्यात फॉर्म भरलेल्या महिलांना या योजनेचा लाभ मिळाला आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img