21.7 C
New York

Pune Metro : गणेशोत्सवात पुणेकरांच्या सेवेत असणार मेट्रो मध्यरात्री पर्यंत सुरू

Published:

आज राज्यभरात गणेशोत्सवाचा सोहळा पाहायला मिळत आहे. घरोघरी गणरायाचं आगमन होत आहे, गणेशोत्सवासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून अनेक भाविक मोठमोठ्या शहरांमध्ये येत असतात. ज्यादा बस, पोलिस सुरक्षा आदीची मोठी तयारी त्याच्यासाठी मोठ्या शहरांमध्ये केली जाते, पुण्यातील गणेशोत्सवात अशातच मेट्रोदेखील (Pune Metro) गणेशभक्तांच्या सेवेत तैनात असणार आहे. महामेट्रोने या गणेशोत्सव कालावधीत मेट्रोच्या फेऱ्या व वेळेतही वाढ केली असल्याची माहिती आहे. तर गणेश विसर्जनाच्या दिवशी मेट्रो (Pune Metro) दिवस-रात्र धावणार असल्याची माहिती आहे.

Pune Metro पुणे मेट्रो प्रशासनाने वेळ आणि फेऱ्या वाढवल्या

पुणे महामेट्रो (Pune Metro) प्रशासनाने याबाबतची माहिती दिली आहे. गणेशोत्सवाच्या कालावधीत पुणे शहराच्या बाहेरून अनेक नागरिक देखावे पाहण्यासाठी पुण्यात येत असतात. त्यांच्या सेवेकरिता तसेच पुणेकरांच्या सेवेसाठी मेट्रोने (Pune Metro) हा निर्णय घेतला आहे. इतर दिवशी मेट्रो सकाळी 7 ते रात्री 10 या वेळेमध्ये धावते. मात्र आता गणेशोत्सव काळात पहिल्या 3 दिवसांमध्ये मेट्रो (7 ते 9 सप्टेंबर) मेट्रो सकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 11 वाजेपर्यंत धावणार आहे.

महाविकास आघाडीचं सरकार येऊ दे; खडसेंचं बाप्पाला साकडं

Pune Metro विसर्जनाच्या दिवशी दिवस-रात्र सुरू राहणार मेट्रो

त्यानंतर उत्सवाचे पुढचे 3 दिवस मेट्रो सकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत धावणार आहे. त्याचबरोबर विसर्जनाच्या दिवशी (17 सप्टेंबर) सकाळी 6 वाजता सुरू होणारी मेट्रो (Pune Metro) दुसऱ्या दिवशी (दि. 18) सकाळी 6 वाजेपर्यंत म्हणजे सलग 24 तास धावणार आहे. 18 सप्टेंबरला पुन्हा ती नेहमीप्रमाणे सकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 10 वाजेपर्यंत धावणार आहे. या वर्षी गणेशोत्सवात मेट्रो सलग 40 तास धावणार आहे. प्रवाशांच्या गरजेनुसार मेट्रोच्या फेऱ्यांमध्येही वाढ करण्यात येणार असल्याची माहिती मेट्रो (Pune Metro) प्रशासनाने दिली आहे.

Pune Metro पुण्यात गणेशोत्सवाचा जल्लोष

पुण्यात ढोल ताशांच्या गजरात मानाच्या गणपतींसह इतर मंडळाच्या मिरवणुकीला सकाळपासून सुरूवात झाली आहे. मोठ्या संख्येने पुणेकर मिरवणुकीत सहभागी झाले आहेत, सकाळी 10 वाजल्यापासून शहरात मोठी गर्दी दिसून येत आहे. पुणेकर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात गणरायाचं स्वागत करताना दिसत आहेत.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img