19.1 C
New York

Mansi Naik : विधानसभेपूर्वी मानसी नाईकचे राजकारणात येण्याचे संकेत

Published:

विधानसभा निवडणुका (Vidhansabha Elections) अवघ्या काही महिन्यांवर आल्यात. त्यामुळे सर्वांच राजकीय नेत्यांनी आपल्याला उमेदवारी मिळावी म्हणून जोरदार कंबर कसली. यात अभिनेते आणि अभिनेत्रींही मागे नाहीत. आजवर अनेक कलाकारांनी राजकारणात आपलं नशीब आजमावलं. अशातच अभिनेत्री आणि नृत्यांगणा मानसी नाईकने (Mansi Naik) राजकारणात येण्याचे संकेत दिले आहेत.

परभणणीत भाजपचे महानगरप्रमुख राजेश देशमुख यांनी दहीहंडी स्पर्धेचं आयोजन केलं होतं. मानसी नाईक या दहीहंडीला प्रमुख पाहूणी म्हणून आली होती. त्यावेळी मानसीच्या बहारदार नृत्याचा कार्यक्रम झाला. यावेळी तिने माध्यमांशी संवाद साधला. तिला राजकारणात येणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी तिने येस, हो. मलाही भविष्यात राजकारणात यायला आवडेल, असं मानसीने सांगितले. पण कोणत्या पक्षातून निवडणूक लढवणार, हे तिने गुलदस्त्यातच ठेवलं. त्यामुळं मानसी कोणत्या राजकीय पक्षात प्रवेश करणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

गणेशोत्सवात पुणेकरांच्या सेवेत असणार मेट्रो मध्यरात्री पर्यंत सुरू

तुम्हाला कोणता नेता आवडतो? असा प्रश्न तिला विचारला असता ती म्हणाली, मला कोणता राजकारणी आवडतो हे सांगण्यासाठी मी खूप लहान आहे. पण राजकारण असो किंवा इतर कोणतेही क्षेत्र, प्रत्येकजण आपल्या मेहनतीने तिथपर्यंत पोहोचतो. मी कुणा एकाचं नाव घेऊ इच्छित नाही. त्यांच्याच प्रेमापोटी आम्ही कलाकार येतो. ते सर्व माझे आहेत, मी त्यांची आहे, असं मानसी म्हणाली.

मानसी नाईक म्हणाली की, परभणीत येऊन मला खूप छान वाटतंयच, मला परभणीत बोलावलं, परभणीकरांना भेटण्याची संधी मिळाली, गोड वाटतंय… इकडे येऊन वेगळीच वाईब आली. पॉसिटिव्हिटी पाहायला मिळाली. मला इकडे पुन्हा यायला आवडेल, असं मानसीने सांगितलं.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img