Kalyan Flower Market : गणेशोत्सवात आपल्या लाडक्या बाप्पाचे स्वागत लाल फुलांनी करण्यासाठी तसेच विविध फुलांनी सजविण्यासाठी गणेश भक्तांची धावपळ होत आहे. गणेशभक्तांची फुलांची मागणी पाहता कल्याणातील एपीएमसी मार्केटमध्ये विविध राज्यातून तसेच जिल्ह्यातून वेगवेगळ्या प्रकारच्या फुलांची आवक वाढली आहे.मुंबई , ठाण्यातील फूल विक्रेत्यांना काही वर्षापूर्वी फुलांना दादर येथे बाजारपेठ असल्याने दादरला जावे लागत होते.कृषी उत्पन्न बाजार समितीने त्यानंतर कल्याणात फुलबाजारासाठी जागा उपलब्ध करून दिली.
विधानसभेपूर्वी मानसी नाईकचे राजकारणात येण्याचे संकेत
एपीएमसी मार्केटमध्ये गेल्या दोन दिवसापासून विविध जिल्ह्यातून शंभर ते सव्वाशे हून अधिक जीप ट्रक मधून पंधराशे क्विंटल विविध प्रकारची फुले विक्रीसाठी मार्केटमध्ये आवक झाली. फुलांची मागणी मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव काळात असल्याने फुलांची आवक दोन हजार क्विंटल पोचू शकेल असाही विश्वास घाऊक फुल विक्रेत्यांनी दिला. फुलांनी भरलेल्या सुमारे 133 पिक अप व्हॅन तर मोठे पाच ट्रक असे 146 गाड्या मधून सुमारे दीड हजार क्विंटल फुले गेल्या दोन दिवस फुले मार्केट विक्रीसाठी आली असल्याची माहिती कल्याण कृषी उत्पन्न बाजारसमितीमधील घाऊक फुलं विक्रेत्यांनी दिली तर गेल्या दोन दिवसापासून मिळणार्या फुलाच्या किमतीच्या गणेशोत्सवाच्या आगमनामुळे दरात अचानकपने वाढ झाली आहे.
फुल मार्केटमधील विविध फुलांचे दर असे…
झेंडू ऑरेंज 120 /150 रुपये किलो
झेंडू येलो 80/100 रुपये किलो
कापरी 160/200 रुपये किलो
सफेद सेवंती 150 रुपये किलो
येलो शेवंती 250/300 रुपये किलो
निशिगंधा 400/500 रुपये किलो
लूज गुलाब 300 रुपये किलो
सोनचाफा 800 रुपये शेकडा,
आस्टर 300 रुपये किलो
गुलाब पाकळी 250 रुपये किलो
शेवंती पिंक 300 रुपये किलो
जरबेरा 100 रुपये बंडल
आर्केड 600 रुपये बंडल
जिप्सी 500 रुपये बंडल
लिली 30 रुपये बंडल
मोगरा 400/500 रुपये किलो
काकडा 300 रुपये किलो
जूई 600 रुपये किलो