संपूर्ण राज्यात सध्या गणेशेत्सोवनिमित्त (Ganeshotsav 2024) आनंदाचं, उत्साहाचं वातावरण आहे. राज्यभरातल्या तेसचे देशातील सर्वच भाविकांसाठी गणेशोत्सव हा अतिशय महत्वाचा सण असून गणरायाच्या स्वागतासाठी सर्व भाविक उत्साहित असतात. गणेश चतुर्थीच्या दिवशी गणरायाला घरी वाजत गाजत आणून, त्याची सेवा करून भाविक त्याचे आशीर्वाद घेतात. मात्र गणरायाचा मुक्काम संपल्यावर विसर्जनावेळी त्याला साश्रू-नयनांनी निरोप देताना पुढच्या वर्षी लवकर या… असा गजरही होतो. ढोल-ताशांच्या गजरात आणि जल्लोषात भाविक विसर्जन करतात. यावेळी अनेक जण नृत्यही करतात. यावेळी कर्तव्यावर उपस्थित असलेले पोलीसही काहीवेळा नृत्य करतात. मात्र पोलिसांचे हेच नृत्य आता इतिहासजमा होण्याची चिन्हे आहेत. कारण पोलिसांना गणेशोत्सवादरम्यान नाचण्यापासून मनाई करण्यात आली आहे. या संदर्भात मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी आदेश जारी केले आहेत. त्यामुळे पोलीसांना गणेशोत्सवादरम्यान नाचता येणार नाही.
Ganeshotsav 2024 पोलीस आयुक्तांचे महत्वपूर्ण आदेश
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर 6 सप्टेंबर रोजी सुरक्षाव्यवस्था व पोलीस दलाची उपलब्धता याचा आढावा घेण्यासाठी मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी बैठक घेतली. या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. गणेशोत्सवादरम्यान यावेळी मुंबईत पोलिसांनी वर्दीवर नाचू नये, अशी सक्त ताकीद पोलीस आयुक्तांनी दिली आहे. सर्व पोलीसांना मुंबई पोलीस आयुक्तांनी महत्वाचे आदेश दिले आहेत. गणेशोत्सवादरम्यान त्यानुसार, ढोल-ताशांच्या गजरात, त्या तालावर कोणताही पोलीस कर्मचारी नाचताना आढळल्यास त्यांच्यावर सक्त कारवाई करण्यात येईल, अशी तंबी देण्यात आली आहे. पोलिसांनी त्यांच्या गणवेशाचा आदर राखला पाहिजे, असे ते या बैठकीत म्हणाल्याची माहिती समोर आली आहे.
गणेशोत्सव काळात पुणे शहरासह ग्रामीणमध्ये मद्य विक्री बंद
” गणेशोत्सव हा सार्वजनिक उत्सव आहे. राज्याततील नागरिकांची सुरक्षा सुनिश्चित करणे हा पोलिसांचा मुख्य उद्देश आहे. या काळात पोलीस कर्मचारी सार्वजनिक ठिकाणी त्यांच्या कर्तव्यात व्यस्त असले पाहिजेत, नाचणे हे त्यांच्यासाठी योग्य नाही.” असे आयुक्तांनी नमूद केले. ‘ जर एखादा पोलीस कर्मचारी नियमांचे उल्लंघन करताना आढळला तर त्याच्याविरोधात तत्काळ, कडक कारवाई करण्यात येईल ‘ असेही या बैठकीत नमूद करण्याचत आले.
Ganeshotsav 2024 मुंबई पोलीस सज्ज
गणेश चतुर्थी उत्सवादरम्यान सुरक्षा व्यवस्थेसाठी मुंबई सज्ज आहे. मुंबई पोलिसांनी ‘गणपती आगमना’साठी पुरेशी व्यवस्था केली आहे. सर्व मार्गांवर सुरक्षा तैनात करण्यात आली आहे आणि मंडप देखील सुरक्षित करण्यात आले आहेत,असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. आम्ही बैठका घेतल्या आहेत. गणपती विसर्जनासाठी सीसीटीव्ही, ट्रॅफिक मॅनेजमेंट, 30 डीसीपी आणि सुमारे 2500 अधिकारी यांची व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय, इतर विशेष तुकड्याही तैनात करण्यात आहेत.