‘जो हिंदू हित की बात करेगा, वही देशपर राज करेगा’ अशी थेट आणि स्पष्ट गर्जना करणारे धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या (Dharmaveer Anand Dighe ) व्यक्तिमत्त्वाचे पदर ‘धर्मवीर – 2’ (Dharmaveer 2 Movie) या चित्रपटात उलगडणार आहेत. (Social Media) या चित्रपटाच्या ट्रेलरमुळे अंगावर (Marathi Movie) अक्षरशः काटा येत असून 27 सप्टेंबरला ‘धर्मवीर – 2’ प्रदर्शित होण्याची प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.
नव्या ट्रेलरमधून दिघेसाहेबांची विविध रुपं दाखवण्यात आली आहेत. सर्वसामान्यांसाठी झटणारे, अन्याय रोखणारे, महिलांना न्याय मिळवून देणारे, धर्मासाठी लढणारे दिघेसाहेब या गाण्यात दिसतात. त्याशिवाय हिंदुत्त्वाची गोष्ट उलगडण्यात आली आहे. त्यामुळे हिंदुत्त्वाविषयी थेट आणि आक्रमक भूमिका घेणारे साहेब यात दिसतात. म्हणूनच आता चित्रपटात काय कथानक उलगडणार याच कुतुहल निर्माण झाले आहे. आभाळाएवढं कर्तृत्व आणि व्यक्तिमत्त्व असलेल्या या लोकनेत्याचा जीवनप्रवास चित्रपटाच्या ए का भागातून दाखविणे शक्य नव्हते. “धर्मवीर” चित्रपटाच्या माध्यमातून धर्मवीर आनंद दिघे साहेब जगभरात पोहोचले आणि ‘असा माणूस होणे नाही’ हे ही सर्वांना समजलं. त्यांच्या आयुष्यातील अशा भरपूर गोष्टी आहेत ज्या जनतेसमोर येणं गरजचं आहे, त्यामुळेच आम्ही ‘धर्मवीर – 2’ करण्याचे ठरविले.
‘मी माझ्या देशावर नाराज!’ ‘इमर्जन्सी’ची रिलीज डेट पुढे ढकलली
चित्रपटाच्या या पूर्वी प्रदर्शित केलेल्या टीजर आणि ट्रेलरला तुफान प्रतिसाद मिळाला आहे. चित्रपटाची गाणीही गाजत आहेत. त्यानंतर आता आणखी एक नवा ट्रेलर लाँच करण्यात आला आहे. ट्रेलरला प्रेक्षकांकडून तुफान प्रतिसाद मिळत असून हा चित्रपट मराठी आणि हिंदी या दोन भाषांमध्ये देशभरात प्रदर्शित केला जाणार आहे. संगीतकार चिनार महेश आणि अविनाश विश्वजित यांनी “धर्मवीर -२” मधील गाण्यांचं संगीत दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटातील गाणी देखील चाहत्यांमध्ये वाजू लागली आहेत. तसेच नुकताच रिलीज झालेले ट्रेलर देखील प्रेक्षकांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे.
नव्या ट्रेलरमधून दिघेसाहेबांची विविध रुपं दाखवण्यात आली आहेत. सर्वसामान्यांसाठी झटणारे, अन्याय रोखणारे, महिलांना न्याय मिळवून देणारे, धर्मासाठी लढणारे दिघेसाहेब या गाण्यात दिसतात. त्याशिवाय हिंदुत्त्वाची गोष्ट या चित्रपटामध्ये उलगडण्यात आली आहे. ज्याप्रमाणे ‘धर्मवीर’ चित्रपटाला रसिकप्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला त्यापेक्षाही ‘धर्मवीर – 2’ चित्रपटाला प्रतिसाद मिळेल याची आम्हाला आशा असल्याचे साहील मोशन आर्ट्सचे निर्माते मंगेश जीवन देसाई आणि झी स्टुडिओजचे उमेश कुमार बन्सल यांनी सांगितले. येत्या 27 सप्टेंबरलाला ‘धर्मवीर – 2’ हा चित्रपट मराठी आणि हिंदी भाषेतून आपल्या भेटीस येणार आहे.