21.7 C
New York

Vinesh Phogat : पॉलिटिक्ससाठी राजीनामा! विनेश फोगाटने सोडली रेल्वेतील सरकारी नोकरी

Published:

हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर कुस्तीपटू विनेश फोगाटने (Vinesh Phogat) आज काँग्रेस नेत्यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला. पक्षात प्रवेश दिल्यानंतर काँग्रेस चरखी दादरी विधानसभा मतदारसंघातून विनेशला उमेदवारी देण्याचीही शक्यता आहे. प्रवेश घेण्याआधीच विनेशने एक मोठा निर्णय घेतला होता. आगामी राजकारणासाठी तिने रेल्वेतील नोकरीचा राजीनामा दिला आहे. विनेश फोगाटने स्वतःच या निर्णयाची माहिती दिली होती.

रेल्वेतील सेवेचा कार्यकाळ जीवनातील सर्वात अविस्मरणीय आणि गौरवपूर्ण राहिला. मी रेल्वे परिवाराची नेहमीच आभारी राहिल. जीवनाच्या या वाटेवर मी स्वतःला रेल्वेच्या सेवेपासून दूर करत आहे. माझा राजीनामा मी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवला आहे. राष्ट्राच्या सेवेसाठी रेल्वेने मला जी संधी दिली त्याबद्दल मी भारतीय रेल्वेची नेहमीच आभारी राहिल अशी पोस्ट विनेश फोगाटने सोशल मीडियावर केली आहे.

निवडणुकीआधीच विनेश अन् बजरंगची काँग्रेसमध्ये एन्ट्री

Vinesh Phogat विनेशच्या एन्ट्रीने राजकारण बदलणार

विनेश फोगाटची राजकारणातील एन्ट्री राज्याच्या राजकारणात मोठा बदल घडवून आणू शकतो. खाप पंचायत आणि शेतकऱ्यांचा फोगाटला असलेला पाठिंबा पाहता निवडणुकीत याचा फायदा मिळू शकतो. असं असलं तरी विनेश फोगाटने अजून तरी राजकारणातील प्रवेशाची घोषणा केली नव्हती. थेट काँग्रेस मुख्यालयात येऊन पक्षात प्रवेश घेतला. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर विनेशने राजकारणात पदार्पण केलं आहे. यामुळे आता राज्याच्या राजकारणाला एक वेगळी दिशा देणारी ही घटना ठरणार असल्याचे सांगितले जात आहे. ज्यावेळी विनेश फोगाटने कुस्तीतून निवृत्तीची घोषणा केली होती. त्यावेळी काँग्रेस खासदार दीपेंद्र सिंह हुड्डा यांनी त्यांना पाठिंबा दिला होता. ज्येष्ठ नेते भूपेंद्र सिंह हुड्डा यांनीही विनेशला राज्यसभेत पाठवण्याची मागणी केली होती. वयामुळे ही गोष्ट शक्य नव्हती. विनेशचे काका महावीर फोगाट आणि चुलत बहिण बबिता फोगाट यांनी मात्र काँग्रेसच्या या धोरणावर टीका केली होती.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img