पावसाचा (Rain) जोर वाढल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी पावसामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. दरम्यान, चांगल्या पावसामुळं धरणांच्या पाणीसाठ्यात (Dam Water Storage) देखील मोठी वाढ झाली आहे. राज्यातील सर्व प्रमुख धरणातील पाणीसाठा 82.24 टक्क्यांवर गेला आहे. मागील वर्षी याच कालावधीत राज्यातील प्रमुख धरणांमधील जलसाठा हा 64.76 टक्के होता.
Dam Water Storage कोणत्या विभागातील धरणांमध्य किती पाणीसाठा?
नागपूर विभाग – 82.36 टक्के
अमरावती विभाग – 84.64 टक्के
मराठवाडा 62.21 टक्के
नाशिक 76.67टक्के
पुणे 90.63 टक्के
कोकण 93.40 टक्के
महाराष्ट्रात आज पावसाचा जोर वाढणार
Dam Water Storage कोयनेसह उजनी धरण हे 100 टक्के भरलं
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, जायकवाडी धरणातील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. सध्या जायकवाडी धरणात 92.11 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. उजनी धरण 100 टक्के भरलं आहे. कोयना धरण देखील 100 टक्के भरलं आहे. मागील वर्षी याचवेळी 80.24 टक्के पाणीसाठा होता. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलावात मिळून 98.24 टक्के पाणीसाठा आहे. 90.54 टक्के जलसाठा मागील वर्षी याचवेळी होता.
Dam Water Storage विदर्भात आजही पावसाचा जोर कायम राहणार
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार दिलेल्या माहिततीनुसार, आज राज्यातील काही भागात जोरदार पावसाची शक्यता आहे. विदर्भात आजही पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. आज संपूर्ण विदर्भात पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. त्यामुळं या भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे.