19.2 C
New York

Bigg Boss Marathi : ‘वैभव त्याच्या बॉडीमुळे दिसतोय….’, निक्कीने केले वादग्रस्त वक्तव्य

Published:

‘बिग बॉस मराठी’च्या घरात सहाव्या आठवड्याची (Bigg Boss Marathi) सुरुवात चांगलीच दणक्यात झाली आहे. (Bigg Boss Marathi) घरातला सदस्यांमध्ये मतभेद होण्यास सुरुवात झाली आहे. टीम A मध्ये फूट पडलेली पाहायला मिळत आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या व्हिडीओत आपण पाहू शकतो की, निक्की (Nikki) आणि अरबाज (Arbaaz) वैभव (Vaibhav) विषयी बोलताना दिसत आहेत.

निक्की अरबाजला म्हणते की, वैभवला तुझ्या आणि माझ्यापासून जेलीसी आहे. एका गोष्टीवरून नाही तर अनेक गोष्टीवरून त्याला आपल्यासोबत जेलेसी आहे. तुझा राग, गेम जास्त उभरून दिसतो. विकेंडच्या वार पण तूझ्याबद्दल बोलले जाते. तुझी निगेटिव्ह का होईना पण भाऊच्या धक्यावर बोलले जाते. त्यांना जेलिसी आहेत की त्याच्या बद्दल बोलले जात नाही. वैभव फक्त त्याच्या बॉडीमुळे इथे दिसत आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या या आठवड्यात अजून काय काय आपल्याला पाहायला मिळेल. निक्कीच्या अश्या बोलण्याने वैभव काय रिॲक्ट करेल. हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे.

‘तुला थोडी तरी लाज असेल तर…’; जान्हवी निक्कीवर भडकली

‘बिग बॉस मराठी’चा पाचवा सीझन सध्या चांगलाच चर्चेत आहे. घरातील स्पर्धकांमध्ये दिवसेंदिवस वाद वाढतच चालला आहे. आता आजच्या भागात काय घडणार हे जाणून घेण्याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. बिग बॉस मराठीच्या घरात आज भांड्याला भांड लागणार आहे. निक्की आणि जान्हवीमध्ये जेवण बनवण्यावरून मोठा वाद होणार आहे. निक्कीने घरातील ड्युटी करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे संपूर्ण घरालाच तिचा प्रचंड राग आलेला आहे.

बिग बॉस मराठीच्या समोर आलेल्या प्रोमोमध्ये जान्हवी निक्कीला म्हणत आहे,”तुला थोडी तरी लाज वाटत असेल तर मी जेवण बनवलेलं तू जेवणार नाहीस.” तर निक्की म्हणत आहे,”माझ्या वाकड्यात गेलं तर मी गळाच पकडत असते. निक्की आणि जान्हवी आज काय धुमाकूळ घालणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. त्यामुळे आजचा भाग पाहायला अजिबात विसरू नका.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img