20.4 C
New York

Mumbai News : मदर तेरेसा फाउंडेशन ची नशा मुक्ती जनजागृती

Published:

मुंबई / रमेश औताडे

शिक्षण, सदभावना आणि राष्ट्रप्रेम विकसित करण्यासाठी मदर तेरेसा फाउंडेशनचे दे (Mumbai News) शभर कार्य सुरू आहे. समाजाला व्यसनमुक्त करण्यासाठी आत्तापर्यंत फाउंडेशन ने ४२ ” नशा मुक्ती केंद्र ” सुरू केली आहेत व अजून त्यांची संख्या वाढत असून त्यामार्फत जनजागृती करण्यात येत आहे. अशी माहिती फाउंडेशन चे राष्ट्रीय संयोजक व माजी आमदार समाजवादी पार्टी चे राष्ट्रीय सचिव मोहम्मद अरशद खान मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

फाउंडेशनच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा उपासना वैश्य यांनी सांगितले की, महिला सक्षमीकरण कार्यशाळा व कुटुंब सल्ला केंद्र फाउंडेशन ने सुरू केले आहे. तर प्रदेश अध्यक्ष अल्ताफ सनाउल्लाह अंसारी म्हणाले, तरुण वर्गात उद्योग व्यवसाय वाढावा यासाठीही फाउंडेशन कार्य करत आहे.

पावसाच्या तडाख्याने मराठवाड्यात 12 मृत्यू; 5 लाख हेक्टरवरील पिके जमीनदोस्त..

राष्ट्रीय मानवाधिकार व न्याय प्राधिकरण चे अध्यक्ष अहमद कुरैशी हे न्याय दान विभागाच्या माध्यमातून कायदेविषयक मार्गदर्शन करत आहेत. यावेळी काशिराम विचार मंचचे प्रदेश अध्यक्ष रहमतुल्लाह खान, अब्दुल रहमान तारिक उपस्थित होते.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img