17.6 C
New York

Bigg Boss Marathi : जान्हवी आणि घनःश्यामच्या वादाने गाठलंय टोक

Published:

‘बिग बॉस मराठी’च्या घरात काल (Bigg Boss Marathi New Season ) नॉमिनेशन टास्क पार पडल्याने वातावरण तापलेलं आहे. (Bigg Boss Marathi) नॉमिनेट झालेले सदस्य नॉमिनेट करणाऱ्या सदस्यांवर आपली नाराजी व्यक्त करताना दिसत आहेत. आजच्या भागात जान्हवी (Janhvi Killekar) आणि घन:श्यामच्या (Chota Pudhari) वादाने टोक गाठलेलं पाहायला मिळणार आहे. पण त्यांच्यातील वादामुळे इतर सदस्यांना मात्र काहीही फरक पडणार नाही आहे.

‘बिग बॉस मराठी’च्या आजच्या भागाच्या प्रोमोमध्ये (Bigg Boss Marathi New Promo) जान्हवी घन:श्यामसोबत वाद घालत म्हणत आहे,’सगळ्यांना माहिती आहे तुला अक्कल नाही. अख्या घराने तुला नॉमिनेट केलं आहे. त्यावर घन:श्याम म्हणतो,”मला फरक पडत नाही. तू जेलमध्ये राहून आली आहेस. तुला अक्कल नाही”. पुढे घन:श्यामला फटकारत जान्हवी म्हणते’,अक्कल शून्य आहेस तू”.

Bigg Boss Marathi पॅडी दादा घेतायत सूरजची शिकवणी

‘बिग बॉस मराठी’च्या आजच्या भागात पॅडी दादा सूरजची शिकवणी घेताना दिसणार आहेत. नॉमिनेशन टास्कमध्ये सूरजने अरबाजला नॉमिनेट केलं असलं तर नॉमिनेट करण्यासाठी त्याच्याकडे योग्य मुद्दे नव्हते. त्यामुळे सूरजला पॅडी दादा म्हणत आहेत,’अरबाजला नॉमिनेट करायला हवं होतंस..तू तुझा निर्णय बदलायला नको होतास. अरबाजबद्दल योग्य मुद्दे मांडायला हवे होते. गेम सुरू असताना लक्ष ठेवायचं आणि ते लक्षात पण ठेवायचं. प्रयत्न करणं सोडू नको’.

‘बिग बॉस मराठी’च्या घरात निक्कीची मनमानी; नियमही मोडलेत

Bigg Boss Marathi ‘बिग बॉस मराठी’च्या घरात निक्कीची मनमानी

‘बिग बॉस मराठी’चा नवा सीझन अत्यंत रंजक वळणावर येऊन पोहोचला आहे. पहिल्या दिवसापासूनच हा कार्यक्रम प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करत आहे. गेल्या आठवड्यात अरबाजचं रौद्र रुप पाहायला मिळालं होतं. यंदाच्या या कठीण आठवड्यात प्रेक्षकांना अनेक नवनवीन ट्विस्ट पाहायला मिळणार आहेत. या आठवड्यात कोण रद्दी ठरलं हे जाणून घेण्याची प्रेक्षकांना उत्सुकता होती. अनेकांचे नंबर सहाव्या आठवड्यातील नॉमिनेशन टास्कमध्ये लागले आहेत.

Bigg Boss Marathi ‘हे’ सदस्य झालेत नॉमिनेट

‘बिग बॉस मराठी’च्या सहाव्या आठवड्यात नॉमिनेशन टास्कमध्ये घन:श्याम दरवडे, आर्या जाधव, धनंजय पोवार, सूरज चव्हाण, निक्की तांबोळी, अभिजीत सावंत, अरबाज पटेल हे सदस्य नॉमिनेट झाले आहेत. आता या सदस्यांपैकी कोण आपला गेम प्लॅन अधिक चांगला आखणार? कोण सेफ होणार आणि कोण अनसेफ होणार? याकडे ‘बिग बॉस’ प्रेमींचं लक्ष लागलं आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img