15.6 C
New York

Manoj Jarange : ‘फडणवीस खुनशी, जादूही करतात’; मनोज जरांगे पाटलांचा घणाघात

Published:

फडणवीसांच्या जवळचे मला येऊन मला गुपचूप भेटतात आणि फडणवीसांची तक्रार करतात. निवडणूक लढवण्याची वेळ आली तर मी सगळं उघड करेन. देवेंद्र फडणवीस खुनशी आहेत. देवेंद्र फडणवीस आमचा शत्रू नाही पण, मराठा द्वेष आणि त्यांची वागण्याची पद्धत विचित्र आहे. आठ दहा दिवसांपूर्वी भाजपचे आठ दहा आमदार माझ्याकडे आले त्यांना मी म्हटलं देवेंद्र फडणवीस यांना जाऊन सांगा आरक्षण द्यायला. ते गेले सागर बंगल्यावर गेले आणि परतच आले नाहीत. देवेंद्र फडणवीस सागर बंगल्यावर जादू करतात, अशा शब्दांत मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी पुन्हा एकदा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली.

राज्यात विधानसभा निवडणुका (Elections 2024) जवळ आल्या आहेत. याच अनुषंगाने मनोज जरांगे पाटील आज पुण्यात होते. येथे त्यांनी पुणे जिल्ह्यातील (Pune) विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेतला. यानंतर माध्यमांशी संवाद साधला. पुणे जिल्ह्यातील मतदारसंघांचा आढावा घेतला आहे. पण कोणताही निर्णय घेतलेला नाही. आंतरवाली सराटीत बैठक घेऊ. समाजबांधवांशी चर्चा करून निर्णय घेऊ, असे जरांगे पाटील म्हणाले.

जरांगे फडणवीसांना गाफील ठेऊन आखणार विधानसभा निवडणुकीची रणनीती..

Manoj Jarange देवेंद्र फडणवीस खुनशी

निवडणूक लढविण्याबाबत पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांबाबत चर्चा झाली. पण निर्णय कोणताही झाला नाही. पुन्हा एकदा बैठक घेऊ आणि मग ठरवू की निवडणूक लढवायची की २८८ उमेदवार पाडायचे. सध्या आम्ही रणनीती उघड करणार नाही. नाहीतर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) डाव टाकतील. आमच्याकडे नेते आंतरवलीत येऊन फुकट चहा पिऊन जातात. पण मी त्यांना नाही म्हणू शकत नाही. फडणवीसांच्या जवळचे मला येऊन मला गुपचूप भेटतात आणि फडणवीसांची तक्रार करतात. निवडणूक लढवण्याची वेळ आली तर मी सगळं उघड करेन. देवेंद्र फडणवीस खुनशी आहेत. दहशतीने निवडणूक जिंकता येत नाही तर मायेनं जिंकता येणार असल्याचे जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले.

सर्व समाजाचे नेते मला गुपचूप भेटतात. यामध्ये भाजपाचेही नेते आहेत. फडणवीस जेलमध्ये टाकण्याची धमकी देतात. पंढरपूरचे अभिजीत पाटील यांनाही अशीच धमकी त्यांनी दिली होती. भाजपाचे नेतेच मला सांगतात की फडणवीस खूप खुनशी आहेत. मराठवाड्यात पावसाने मोठं नुकसान केलं आहे. या नुकसानीचे तत्काळ पंचनामे होण्याची गरज आहे. मदतही लवकर मिळाली पाहिजे. पण फडणवीस ही कामे करत नाही. तात्पुरते नादाला लावतात. लाडक्या बहिणीच्या लेकराला आरक्षण पाहिजे ते कधी देणार ते सांगा असा सवाल जरांगे पाटील यांनी केला.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img