19.2 C
New York

Maharashtra Rain : पावसाच्या तडाख्याने मराठवाड्यात 12 मृत्यू; 5 लाख हेक्टरवरील पिके जमीनदोस्त..

Published:

राज्यात दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत (Maharashtra Rain) आहे. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या दिवशी मुसळधार पाऊस (Heavy Rain) कोसळला. काल सोमवारी बैल पोळ्याच्या दिवशीही पावसाचा जोर कायम होता. विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाने (Weather Update) हाहाकार उडाला. याच दोन दिवसांच्या पावसानं मराठवाड्याला मोठा धक्का दिला आहे. परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यात तब्बल 5 लाख 8 हजार 68 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं आहे. अर्ध्याहून अधिक मंडळांत अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे. पुरात वाहून गेल्याने, पाण्यात बुडाल्यान तसेच वीज पडल्याने 12 जणांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर आणि नगर जिल्ह्यातही (Rain Alert) कुठे जोरदार तर कुठे संततधार पावसाने हजेरी लावली. परभणी जिल्ह्यातील पाथरीत अतिमुसळधार पाऊस झाला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्रीत शेतकरी तर कन्नड तालु्क्यातील घाटशेंद्रा येथे 18 महिन्यांचे मूल पाण्यात वाहून गेले. यानतंर आता पुढील दोन दिवस पावसाची हीच परिस्थिती कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

मराठवाडा, विदर्भाला पावसाने अक्षरश: झोडपलं

मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांत मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे नदी आणि ओढ्यांना पूर आला आहे. शेतात पाणी साचलं आहे. नद्यांना पूर आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. अनेक ठिकाणची घरे पडली आहेत. जनजीवन विस्कळीत झाले आहे. बीड, नांदेड, परभणी, लातूर या जिल्ह्यांत रात्रीपासूनच पावसाचा जोर आहे. येथील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.

Maharashtra Rain पाच लाख हेक्टरवरील पिकांना फटका

या पावसाचा शेतातील पिकांना मोठा फटका बसला आहे. 4 लाख 96 हजार 392 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं आहे. 11 हजार 497 हेक्टर बागायत क्षेत्राचे नुकसान झाले आहे. सहा लाखांहून अधिक शेतकरी बाधित झाले आहेत. तसेच दोन दिवसांच्या या पावसाने तब्बल 12 जणांचा मृत्यू झाला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 1, जालना 2, हिंगोली, बीड, लातूर जिल्ह्यात प्रत्येकी एखक जणाचा मृत्यू झाला आहे.

मराठवाड्यात पावसाने मोठे नुकसान केले आहे. तब्बल 1 हजार 454 गावांना फटका बसला आहे. पावसामुळे अनेक गावांत पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. आतापर्यंत 169 जनावरेही दगावली आहेत. अनेक ठिकाणी पूर आला आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. येथील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत केले जात आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img