11 C
New York

Bigg Boss Marathi : घरात ज्याचा खेळ नाही दमदार, तो सरळ बनणार रद्दीचा भार! कोण होणार नॉमिनेट?

Published:

‘बिग बॉस मराठी’च्या ‘लयभारी’ (Laybhari) सीझनची सध्या सर्वत्र चर्चा आहे. (Bigg Boss Marathi) गेला महिनाभर सदस्यांनी ‘बिग बॉस मराठी’च्या (Bigg Boss Marathi ) घरात चांगलाच धुमाकूळ घातला आहे. सर्वच टास्क, सदस्यांचे कमाल गेम प्लॅन चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहेत. पण भाऊच्या धक्क्यावर रितेश भाऊ (Riteish Deshmukh) म्हटल्याप्रमाणे (Bigg Boss Marathi New Promo) ‘बिग बॉस मराठी’चा सहावा आठवडा खूप कठीण असणार आहे. या आठवड्यात नक्की काय होणार हे जाणून घेण्याची प्रेक्षकांना आता उत्सुकता आहे.

आज ‘बिग बॉस मराठी’च्या घरात ज्याचा खेळ दमदार नाही तो सरळ रद्दीचा भार बनणार आहे. प्रोमोमध्ये, असमाधानकारक कामगिरी करणाऱ्या सदस्यांना आज रद्दीत टाकून इतर सदस्य नॉमिनेट करताना दिसणार आहेत. स्वत:चं डोकं नसणाऱ्यांना, खेळातला समज नसणाऱ्या, स्वत:ची मतं नसणाऱ्या, घरातल्या गद्दार व्यक्तीला सदस्य नॉमिनेट करताना दिसणार आहेत. त्यामुळे सहाव्या आठवड्यात कोणता सदस्य नॉमिनेट होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Bigg Boss Marathi पॅडी गेला निक्कीच्या बोटीत

‘बिग बॉस मराठी’च्या आजच्या भागात ‘बिग बॉस’ पॅडीला विचारत आहेत,”पंढरीनाथ शर्ट छान आहे..गोव्याचा प्लॅन आहे का?”. त्यावर बिग बॉसला उत्तर देत पॅडी दादा म्हणतो,”मला गोवा आवडतो. गोव्याला जाऊन मी नाटकाचे प्रयोग करतो, सिनेमाचं शूटिंग करतो”. पुढे बिग बॉस म्हणतात,”धनंजय काहीतरी वेगळच म्हणत आहेत”. दरम्यान पॅडी दादा निक्कीच्या सोफ्यावर जाऊन बसतात. त्यामुळे बिग बॉस पॅडीला निक्कीच्या बोटीत गेल्याचं म्हणतात.

Bigg Boss Marathi बिग बॉस मराठी’च्या घरातली ‘ही’ बनवाबनवी पाहिलीत का?

आता 36 दिवस ‘बिग बॉस मराठी’चा नवा सीझन सुरू होऊनउलटले आहेत. बिग बॉस मराठी शोचा आता सहावा आठवडा सुरू झाला आहे. गेल्या आठवड्यात सदस्यांची चांगलीच झोप उडाली. भाऊच्या धक्क्यावर रितेश भाऊंनी सगस्यांची चांगलीच शाळा घेतली. गेल्या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घरातून कोणीही सदस्य बाहेर पडलं नाही. ‘बिग बॉस मराठी’चा नवा प्रोमो पाहून बिग बॉस प्रेमींच्या चेहऱ्यावर नक्कीच हसू येईल. प्रोमोमध्ये डीपी दादा वैभव झालेले दिसत आहेत, जान्हवी निक्की आणि सूरज अरबाजच्या भूमिकेत गेलेला पाहायला मिळत आहे. तिघेही आपली भूमिका उत्तम वठवत आहेत. तिघांचा अभिनय पाहताना प्रेक्षकांना मात्र हसू अनावर होणार आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या या आठवड्यात सदस्यांसमोर कोणतं नवं आव्हान उभं ठाकणार? सर्वांचच लक्ष सदस्य यातून कसा मार्ग काढणार याकडेलागलं आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img