11 C
New York

Manipur Violence : मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार, इम्फाळमध्ये हायटेक ड्रोनने हल्ला

Published:

मणिपूरमध्ये गेल्या वर्षभरापासून हिंसाचाराच्या घटना (Manipur Violence) घडत आहेत. या हिंसाचाराच्या घटनांमध्ये आतापर्यंत अनेकांचा मृत्यू झाला. यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लष्करालाही पाचारण करण्यात आले. त्यानंतर तेथील परिस्थिती हळूहळू नियंत्रणात आणि पूर्वपदावर येत आहे. मात्र, असं असतानाच पुन्हा एकदा मणिपूरच्या पश्चिम इम्फाळ जिल्ह्यात हिंसाचार उसळल्याचे वृत्त आहे. या हिंसाचारात एका महिलेसह दोघांचा मृत्यू झाला आहे, तर महिलेची 8 वर्षांच्या मुलीसह 10 जण जखमी झाले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अतिरेक्यांनी कौत्रुक आणि कडंगबंद खोऱ्यातील खालच्या भागात डोंगराच्या वरच्या भागातून गोळीबार केला आणि ड्रोननेही हल्ला केला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे महिला, लहान मुले आणि वृद्धांसह अनेकांना सुरक्षित स्थळी पळावे लागले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 9 जखमींपैकी 5 जणांना गोळ्या लागल्या होत्या. या हल्ल्यात दोन जणांचा मृत्यू झाला, तर 10 जण गंभीर जखमी झाले. या हल्ल्यात दोन पोलीसही जखमी झाले आहेत. या गोळीबाराच्या आणि बॉम्ब हल्ल्यात स्थानिक नागरिकांच्या अनेक घरांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

इम्फाळ पश्चिम जिल्हयातील कौत्रुक परिसरात कथित कुकी अतिरेक्यांनी हायटेक ड्रोनचा वापर करून अनेक आरपीजी (रॉकेट-प्रोपेल्ड ग्रेनेड) तैनात केले आहेत, असं मणिपूर पोलिसांच्या अधिकृत निवेदनात म्हटलं आहे. एका गावाला लक्ष्य करण्यासाठी अशी सात स्फोटके वापरण्यात आल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.

पुणे हादरले! हडपसरमध्ये फायनान्स कंपनीच्या मॅनजेरची निर्घृण हत्या

एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी दोनच्या सुमारास गोळीबार सुरू झाला. त्यानंतर सायंकाळी साडेसातपर्यंत हा गोळीबार सुरू होता. त्यानंतर आता गोळीबार झालेल्या कौत्रुक गावात तणावपूर्ण परिस्थिती आहे. कौत्रुकच्या स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार, गावातील अनेक घरांना आग लागली आहे. दरम्यान, पोलिसांनी अनेक स्थानिक नागरिकांना सुरक्षित स्थळी नेलं आहे.

कौत्रुकमध्ये यापूर्वीही गोळीबाराच्या अनेक घटना घडल्या आहेत. अनेकदा हिंसाचाराच्या घटनांमध्ये गावाला लक्ष्य करण्यात आले. दरम्यान, आता रविवारी संध्याकाळी झालेल्या या घटनेनंतर मणिपूरचे पोलीस महासंचालक राजीव सिंग यांनी सर्व जिल्ह्यांच्या पोलीस अधीक्षकांना जास्तीत जास्त सतर्क राहण्याचे आणि सर्व सीमावर्ती भागात सुरक्षा सुनिश्चित करण्याचे निर्देश दिले आहेत.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img