21.7 C
New York

Devendra Fadanvis : पवार-ठाकरेंना सवाल करत, फडणवीसांनी सांगितला इतिहास

Published:

सिंधुर्दुर्ग येथील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळल्याचं पाहायला मिळालं. मात्र, राज्य सरकारमधील मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी या दुर्दैवी घटनेनंतर माफी मागितली आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही पालघर दौऱ्यात महाराजांच्या पुतळा दुर्घटनेबाबत जाहीरपणे शिवभक्तांची माफी मागितली. मात्र मालवण येथील शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्याप्रकरणी राज्यात महाविकास आघाडीकडून रविवारी आंदोलन करण्यात आले. राज्यातील प्रत्येक शहरांत जोडे मारो आंदोलन झाले. भाजपने आज महाविकास आघाडीचा निषेध करण्यासाठी त्याला उत्तर देण्यासाठी आंदोलन केले. महाविकास आघाडीवर यावेळी उपमुख्यमंत्री अन् भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार हल्ला केला. काँग्रेसने शिवाजी महाराजांसंदर्भात काय, काय केले, त्याची उदाहरणे सांगत आता काँग्रेसला माफी मागण्यास लावणार का? असा प्रश्न विचारला.

महाविकास आघाडीच्या जोडे मारो आंदोलनात स्वत: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, शिवसेना उबाठा पक्षाचे उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे नाना पटोले सहभागी झाले आहेत. तर, शाहू छत्रपतींनीही शरद पवार यांच्यासमवेत या आंदोलनात सहभागी होत राज्य सरकारचा निषेध नोंदवला. महाविकास आघाडीच्या या आंदोलनास प्रत्युत्तर म्हणून भाजपनेही आंदोलन केलं आहे. तर, या आंदोलनाबाबत भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार व उद्धव ठाकरेंना काही प्रश्न विचारले आहेत.

ते राजकारण नाही, उद्धव ठाकरे यांचा सरकारवर हल्लाबोल

Devendra Fadanvis काँग्रेसने चुकीचा इतिहास शिकवला

आम्हाला काँग्रेसने इतके वर्षे इतिहासात शिकवलं की महाराजांनी सुरत लुटली. परंतु खरा इतिहास तो नाही. महाराजांनी सुरत लुटली नव्हती तर तो खजिना घेऊन योग्य त्या लोकांना दिला होता. हा स्वराज्याचा खजिना होता. त्यांनी आक्रमण केलं होतं. पण त्यांनी लूट कधी केली नव्हती. महाराज काही लूट करायला गेले नव्हते, पण असा इतिहास आम्हाला शिकवला गेला. काँग्रेसला इतकी वर्षे काँग्रेसने हा इतिहास शिकवला त्याची माफी मागायला सांगणार आहात की त्यांचे मिंधेपण स्वीकारणार आहात हे सांगितलं पाहिजे, असा टोला फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.

Devendra Fadanvis भाजपचे राज्यभरात आंदोलन

महाराजांच्या पुतळ्यावरून महाविकास आघाडीकडून गलिच्छ राजकारण सुरु आहे. त्याच्या विरोधात भाजपने रविवारी राज्यभर आंदोलन केले. काही शहरांमध्ये मौन बाळगून विरोध दर्शवीला आहे. काही ठिकाणी भाजपा पदाधिकारी कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडी विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत निषेध नोंदवला आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img