26.5 C
New York

Andhra Pradesh Politics : आंध्रात वार फिरलं! जगन रेड्डींना धक्का, दोन खासदारांचा राजीनामा

Published:

आंध्र प्रदेशात सत्ता पालट झाल्यानंतर (Andhra Pradesh Politics) तेथील राजकीय घटनाक्रम वेगाने बदलू लागला आहे. कारण आता राज्याची सत्ता जगन मोहन रेड्डी (Jagan Mohan Reddy) यांच्याकडे नाही तर त्यांचे कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी चंद्राबाबू नायडू यांच्या (Chandrababu Naidu) हातात आहे. नायडू यांचा तेलुगू देसम पक्ष (TDP) केंद्रातही सत्ताधारी एनडीएत सहभागी आहे. याच कारणामुळे आंध्र प्रदेशातील विरोधी वायएसआर काँग्रेसमध्ये पडझड सुरू झाली आहे. पक्षाचे राज्यसभा खासदार मोपीदेवी वेंकटरमण राव आणि बिधा मस्तान राव यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. यानंतर आता असेही सांगितले जात आहे की वायएसआर काँग्रेसचे आणखी सहा खासदार राज्यसभेतून बाहेर होऊ शकतात.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार वेंकटरमण आणि मस्तान या दोघांनीही टीडीपी प्रमुख चंद्राबाबू नायडू यांची भेट घेतली. या भेटीनंतर दोघेही लवकरच तेलुगू देसम पक्षात सामील होतील अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. वेंकटरमण यांना पुन्हा राज्यसभा सदस्य म्हणून नामित करण्यात येईल. तर मस्तान बिनशर्त टीडीपीत सहभागी होण्यास तयार झाले आहेत. यानंतर आता अशीही चर्चा सुरू झाली आहे की वायएसआर काँग्रेसचे आणखी सहा खासदार राज्यसभेतून (Rajya Sabha) बाहेर होऊ शकतात. यातील काही टीडीपी मध्ये तर काही भाजपाचा झेंडा (BJP) हाती घेण्याची शक्यता आहे.

आरोपी हिंदुत्ववादी संघटनेशी निगडीत? बाळासाहेबांचा सवाल

सन 2019 पासून आंध्र प्रदेशातील राज्यसभेच्या सर्व 11 जागा वायएसआर काँग्रेसच्याच ताब्यात आहेत. पण यावेळी मात्र राजकीय गणिते बदलण्याची शक्यता व्यक्त होत आहे. अनेकदा आमदार राहिलेले किरण कुमार रेड्डी आणि वायएस राजशेखर रेड्डी मंत्रिमंडळात मंत्री राहिलेले वेंकटरमण यांना जगन मोहन रेड्डी यांचे विश्वासू मानले जाट होते. परंतु नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत रेपल्ले मतदारसंघातून तिकीट न मिळाल्याने ते वायएसआरसीपी वर नाराज आहेत. राजीनामा देणारे दुसरे खासदार मस्तान यांना आंध्रच्या राजकारणात नायडू यांच्या जवळचे मानले जाते. मस्तान उद्योजक आहेत आणि बीएमआर ग्रुप ऑफ कंपनीजचे चेअरमन आहेत.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img