11 C
New York

Jawhar : जव्हारमध्ये पार पडला पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा

Published:

जव्हार : संदीप साळवे,पालघर

जव्हार (Jawhar) व मोखाडा आणि आसपासच्या तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगार युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी या दृष्टीने पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा हा गुरुवारी सकाळी ११ वाजता जव्हार, येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रकल्प कार्यालयाचे सहाय्यक अधिकारी विठ्ठल कुरवाडे यांच्या करण्यात आले.यात २५ आस्थपनेतून २२७ उमेदवारांना नोकरीची संधी प्राप्त झाली.

रोजगाराभिमुख आणि महत्त्वकांक्षी या प्रकल्पात दहावी, बारावी, आय. टी. आय, पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण झालेले विविध उमेदवारांनी या रोजगार मेळाव्यात उपस्थित राहून संधीचा लाभ घेतला.तर उपस्थित औद्योगिक आस्थापना आणि महामंडळे यांनी नोकरीस उत्सुक असलेल्या उमेदवारांकरिता जागा सहभाग उपलब्ध करून दिला.या स्तुत्य उपक्रमात एम. एस. आर. टी. सी पालघर, एम टेक इंडस्ट्रीज दमण, सी टी आर मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीज नाशिक, टिमा इंडिया प्रायव्हेट लिमिटेड तलासरी, मॅच इंजिनियर्स बोरीवली, सेवा आयशर नाशिक, डीडब्लूएस वाडा, महिंद्रा अँड महिंद्रा इगतपुरी, ब्लू स्टार लिमिटेड, ओनिडा, खोसला प्रोफाइल लिमिटेड, बनस्वारा सेंटएक्स गारमेंट, गोविंदा एचआर सर्व्हिसेस, इत्यादी आस्थापनांनी सहभाग घेतला.

हा उपक्रम जव्हार ,वाडा, मोखाडा आय.टी.आय व जिल्हा कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता कार्यालय, पालघर यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आला.या उपक्रमातून अनेकांना रोजगाराची संधी प्राप्त झाली म्हणून, पालघर लोकसभा खासदार डॉ.हेमंत सावरा, पालघर जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम तसेच विक्रमगड विधानसभा आमदार सुनील भुसारा यांनी कौतुक करत शुभेच्छा दिल्या.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img