26.5 C
New York

Bigg Boss Marathi : निक्की-अरबाज पुन्हा एकत्र येणार; नवा गेम प्लॅन तर नाही ना?

Published:

‘बिग बॉस मराठी’चा नवा सीझन (Bigg Boss Marathi) विविध कारणांनी चर्चेत आहे. सध्या घरात टीम ए च्या (Bigg Boss Marathi New Season) सदस्यांमध्ये फूट पडलेली पाहायला मिळत आहे. याबरोबरच निक्की (Nikki) आणि अरबाज (Arbaaz) यांच्यामध्ये देखील दुरावा निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले होते. दोघांमध्ये मोठी भांडणे झालेली गेल्या काही भागात दिसले होते. पण कालच्या भागात मात्र दोघांनी एकमेकांसोबत बोलून त्यांच्यातील दुरावा कमी केल्याचं पाहायला मिळालं.

‘बिग बॉस मराठी’चा नवा प्रोमो समोर आला आहे. (Bigg Boss Marathi New Promo) प्रोमोमध्ये अरबाजने काचेवर “I Miss You” लिहिलेलं दिसत आहे. त्यानंतर तो हार्टदेखील काढतो. आता निक्की आणि अरबाज यांच्यातील नाते पूर्ववत होणार का, पुढच्या खेळात ते एकमेकांबरोबर कसे राहणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. याबरोबरच टीम ए मधील जान्हवी आणि वैभव यांना हे मान्य असेल का? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

मोबाइल, क्रेडिट कार्ड विसराच.. चेहरा स्कॅन करून होणार पेमेंट; जाणून घ्या

Bigg Boss Marathi ‘बिग बॉस मराठी’च्या घरात तुटलेली मनं परत जुळणार

आजच्या भागात मात्र निक्की आणि अरबाज एकमेकांसोबत गप्पा मारताना दिसणार आहेत. निक्की अरबाजला म्हणतेय, समोर आलेल्या प्रोमोमध्ये”तुला जर कोणी व्यक्ती आवडत असेल तर त्याला रागाच्या भरात काहीही बोलू नकोस. शब्द जपून वापर. लोकांना सत्य दाखव”. त्यानंतर अरबाज निक्कीला मिठी मारताना दिसून येतो. त्यामुळे आता तुटलेली मनं बिग बॉस मराठीच्या घरातील पुन्हा जुळणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Bigg Boss Marathi अभिजीत गुरुंनी सांगितलेली ‘बिग बॉस मराठी’ची व्याख्या

‘बिग बॉस मराठी’ या खेळातील प्रत्येक दिवस हा वेगळा असतो. आजच्या भागात अभिजीत निक्कीला सांगतोय,”बिग बॉस मोठा गेम आहे. संपूर्ण जगात एका माणसाचं पूर्ण जीवन, त्याची जगण्याची पद्धत या सगळ्या गोष्टींना तीन महिन्यांसाठी ब्रेक देण्याचं काम ‘बिग बॉस मराठी’ हा कार्यक्रम करतो. या तीन महिन्यात माणूस अडचणींमधून जातो.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img