26.5 C
New York

Congress : अंतारपूरकर अन् झिशान सिद्धीकींची काँग्रेसमधून हकालपट्टी

Published:

काँग्रेसच्या गोटातून एक महत्त्वाची बातमी समोर आली असून, जितेश अंतारपूरकर आणि झिशान सिद्धिकींची (Zeeshan Siddiqui) काँग्रेसमधून हकालपट्टी करण्या आली आहे. काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी ही माहिती दिली आहे. जितेश अंतारपूरकर आणि झिशान सिद्दीकी हे दुसऱ्या पक्षात जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या दोघांची काँग्रेसमधून हकालपट्टी करण्याची आल्याची माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जाहीर केले आहे. या कारवाईनंतर अंतारपूरकर हे भाजपमध्ये तर, झिशान सिद्धिकी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Congress Action On Jitesh Antarpurkar And Zeeshan Siddiqui)

विधानपरिषद आणि राज्यसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाची काही मतं फुटली होती. त्यानंतर जितेश अंतापूरकर (Jitesh Antarpurkar) आणि काँग्रेसचे काही आमदार हायकमांडच्या रडारवर असल्याची चर्चा होती. त्यानंतर आता काँग्रसकडून अंतारपूरकर यांची पक्षाकडून हकालपट्टी करण्यात आली आहे. तर, इिशान सिद्धिकी यांनी नुकतीच मुंबईत आयोजित अजित पवारांच्या जन सन्मान यात्रेत उपस्थित दर्शवली होती. एवढेच नव्हे तर, अजित पवार हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत. त्यामुळे ते महायुतीचे असो किंवा महाविकासआघाडीचे, जर ते एखादं चांगलं काम करत असतील तर आपली जबाबदारी आहे की आपण त्यांचं कौतुक करावं आणि त्यांचे आभार मानावे”, असे झिशान सिद्दीकी यांनी म्हटले होते.

पश्चिम महाराष्ट्रात ‘राष्ट्रवादी’ सुसाट, पंढरपुरात ‘कमळ’ सुकणार

Congress अंतारपूरकर अशोक चव्हाणांचे निकवर्तीय

अंतारपूरकर हे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे जवळचे मानले जातात. चव्हाण यांच्या भाजप प्रवेशापासून अंतारपूरकर हे भाजपच्या संपर्कात होते. शिवाय त्यांच्यावर विधानपरिषद निवडणुकीत क्रॉस वोटिंग केल्याचाही आरोप ठेवण्यात आला आहे. त्यानंतर आता अंतारपूरकर यांची क्राँग्रेस पक्षाकडून हकालपट्टी करण्यात आली असून, अंतारपूरकर आजचं भाजपमध्ये जाहीर पक्षप्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img