20.6 C
New York

Narendra Modi : पण विरोधकांनी साठ वर्षापर्यंत प्रकल्प रोखला; PM मोदींचे टीकास्त्र

Published:

महाराष्ट्रातील विरोधी दलांनी आपल्या विकासावर कायम ब्रेक लावला. कित्येक दशकांपासून वाढवण बंदराची (Wadhawan Port) गरज होती. मात्र, या प्रकल्पाला साठ वर्षापर्यंत विरोधकांनी रोखलं होतं, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) राज्यातील विरोधी पक्षांवर केली. ते आज वाढवण बंदराच्या भूमिपूजन कार्यक्रमात बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 30) देशातील सर्वात खोल (20.20 मीटर) वाडवण बंदराचे भूमिपूजन झाले.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. यावेळी बोलतांना मोदी म्हणाले की, आम्ही या पोर्टवर 76 हजार कोटींहून अधिक जास्त खर्च कऱणार आहोत. हे देशातील सर्वात मोठं कंटनर पोर्ट असेल. हे देशातीलच नव्हे तर जगातील सर्वात मोठे बंदर असणार आहे. हे बंदर महाराष्ट्राच्या औद्योगिक प्रगतीचे आणि देशाच्या व्यापाराचे मोठं केंद्र होईल, असा विश्वास मोदींनी व्यक्त केला. मोदी म्हणाले की, वाढवणं बंदराचं लोकेशन सोन्याहून पिळलं आहे. वाढवण बंदराकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. हे बंदर देशातील प्रमुख बंदरांपैकी एक असणार आहे. या प्रकल्पामुळे 12 लाख रोजगार निर्माण होणार आहे. पुढं बोलतांना मोदींनी विरोधकांवर जोरदार टीका केली.

मुख्यमंत्र्यांच्या माफीने विषय सुटतो का? मालवण घटनेवरून राऊतांचा रोखठोक सवाल

महाराष्ट्रातील विरोधी दलांनी आपल्या विकासावर कायम ब्रेक लावला. ते महाराष्ट्राला मागे खेचू पाहत आहे. मात्र, महायुतीचे सरकार महाराष्ट्राला आघाडीवर घेऊन जारणार आहे. मागील सरकारने बंदराचे काम पूर्ण होऊ दिले नाही. कित्येक दशकांपासून वाढवण बंदराची गरज होती. मात्र, या प्रकल्पाला साठ वर्षापर्यंत विरोधकांनी रोखलं होतं. या बंदराला काही जण सुरूच होऊ देणार नव्हते, अशी टीका मोदींनी केली. मात्र, 2014 मध्ये दिल्लीत आणि राज्यात आमचं सरकार आल आणि आम्ही या पोर्टच्या कामाला गती दिली. आता रेल्वे आणि हायवेलाही हा प्रकल्प जोडणार आहोत. रोजगार निर्मितासाठी हा प्रकल्प फार महत्वाचा आहे. या वाढवण बंदराकडे देशाचंच नाही तर जगाचंही लक्ष लागल्याचं मोदी म्हणाले.

Narendra Modi कोट्यवधी मच्छिमारांचे उत्पन्न वाढले

पंतप्रधान मोदी म्हणाले की, आमच्या सरकारमुळे अनेक मच्छीमारांचे जीवनमान सुधारले आहे. भारत मत्स उत्पादनात दुसऱ्या क्रमांकाचा देश बनला आहे. मत्स्यशेतीमध्ये महाराष्ट्राचे मोठे योगदान आहे. शासनाच्या प्रयत्नांमुळे मच्छिमारांचे कोट्यवधींचे उत्पन्न वाढले आहे. यासोबतच आमचे सरकार मच्छिमारांच्या सुरक्षेसाठीही प्रयत्न करत असल्याचं मोदी म्हणाले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img