17.6 C
New York

Devendra Fadnavis : अजित पवारांमुळे..” अखेर फडणवीसांनीही मान्य केलंच

Published:

राज्यात लोकसभा निवडणुकीत महायुतीची मोठी पडझड (Lok Sabha Elections) झाली. त्यातही भाजपला सर्वाधिक (BJP) फटका बसला. भाजपाची घोडदौड फक्त 9 जागांवरच थांबली. एकनाथ शिंदे यांच्या (Eknath Shinde) शिवसेनेचा स्ट्राईक रेट चांगला आहे. उद्धव ठाकरेंची शिवसेना, अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप या तिघांच्या तुलनेत शिंदेंनी सरस कामगिरी केली. आता राज्याला विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. महायुतीने जुन्या चुका सुधारून सावध पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. यातच देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केलेल्या वक्तव्याची चर्चा सुरू झाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी आम्ही ओव्हर कॉन्फिडन्ट होतो पण आता चित्र बदललं आहे, असे फडणवीस म्हणाले.

न्यू इंडिया डायमंड स्टेट समिट महाराष्ट्र या कार्यक्रमात ते बोलत होते. लोकसभेच्या निवडणुकीनंतर राज्यातील चित्र आता बदललं आहे. अजित पवार आमच्यासोबत आल्याने थोडा संभ्रम निर्माण झाला होता. कार्यकर्त्यांना समजावून सांगण्यात वेळ गेला. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत उमेदवारी जाहीर करण्यास वेळ लागला. या निवडणुकीत कार्यकर्ते म्हणून आम्ही जरा ओव्हर कॉन्फिडन्ट होतो. त्यामुळे जितक्या क्षमतेनं काम करायाला हवं होतं तितक्या क्षमतेनं आम्ही काम केलं नाही. ही गोष्ट कार्यकर्त्यांच्याही लक्षात आली आहे. त्यामुळे आता आगामी निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आला आहे.

‘एकदा नाही शंभरवेळा डोकं ठेवायला मी तयार’; शिंदेंनी मागितली माफी!

फडणवीस पुढे म्हणाले, अजित पवार महायुतीत आल्याने थोडा संभ्रम निर्माण झाला होता. ज्यांच्या विरोधात आयुष्यभर लढलो त्यांच्यासाठीच आता मतं कशी मागायची असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला होता. त्यामुळे कार्यकर्त्यांना समजावून सांगण्यात थोडा वेळ गेला. आता परिस्थिती बदलली आहे. या गोष्टी कार्यकर्त्यांच्या लक्षात आल्या आहेत. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीत महायुती सरस कामगिरी करेल. राज्यात पुन्हा महायुतीचंच सरकार येईल यात काहीच शंका नाही, असा विश्वास राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img