बांग्लादेशच्या अर्थव्यवस्थेचा मोठा आधार म्हणून येथील कापड उद्योगाकडे (Textile Industry) पाहिले जाते. परंतु बांग्लादेशातील हिंसाचाराचे (Bangladesh Crisis) चटके या उद्योगाला बसले आहेत. बांग्लादेशला निर्यातीतून मिळणाऱ्या एकूण उत्पन्नापैकी तब्बल 80 टक्के वाटा एकट्या (Bangladesh News) कापड उद्योगाचा आहे. देशाच्या एकूण जीडीपीत 11 टक्के योगदान देतो. इतकेच नाही तर कापड उद्योग देशात अनेक रोजगार देखील उपलब्ध करून देतो. पाच ऑगस्टपासून देशात हिंसक आंदोलने सुरू झाली. या आंदोलनामुळे शेख हसीना (Sheikh Hasina) यांना राजीनामा देऊन देश सोडावा लागला. सध्या शेख हसीना भारतातच आहेत. त्यांनी अन्य देशात राजकीय शरण मागितली होती परंतु त्यांना परवानगी मिळाली नाही त्यामुळे सध्या त्यांनी भारतातच राहणे पसंत केले आहे.
Bangladesh Crisis साडेचार हजार कोटी पाण्यात
देशात जवळपास दोन महिने सरकार विरोधात निदर्शने आंदोलने सुरू होती. या अशांत वातावरणाचा फटका कारखान्यांना बसला. याचा परिणाम म्हणून आर्थिक उलाढाल कमी झाली. बांग्लादेश गारमेंट्स मॅन्यूफॅक्चर्स अँड एक्स्पोर्टस असोसिएशनने (बीजीएमई) नुकताच एक रिपोर्ट जारी केला आहे. यामध्ये बंद आणि दळणवळण व्यवस्था बाधित झाल्याने 6400 कोटी टका (जवळपास 4500 कोटी रुपये) इतके नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे.
बीजीएमईच्या नवनिर्वाचित अध्यक्षांनी सांगितले की या वर्षी निर्यातीला 45 अब्ज डॉलर्स पर्यंत पोहोचवणे शक्य होणार नाही. आताच संकट फार दिवस टिकणार नाही. आम्ही लवकरच यामधून बाहेर पडू. नुकसान नेमकं किती झालं आहे याची माहिती घेतली जात आहे. त्यानंतरच कळेल की नेमके किती नुकसान झाले आहे.
विधानसभेसाठी भाजपचा असा आहे नवा प्लॅन
Bangladesh Crisis कापड उद्योग संकटात
बीजीएमईएचे माजी अध्यक्ष गुलाम सरवर मिलन यांनी सांगितले की राजकीय अशांतता आणि पुरामुळे कापड उद्योगाचं मोठं नुकसान झालं. उत्पादन आणि कच्च्या मालाचा पुरवठ्यावर विपरीत परिणाम झाला आहे. कापड उद्योगासमोर अभूतपूर्व संकट उभं राहिलं आहे. मागील वर्षाच्या तुलनेत उत्पादनात 15 ते 20 टक्के घट झाली आहे. कापडाच्या ऑर्डरवर परिणाम झाला आहे. कारण गुंतवणूकदार आणि ऑर्डर देणारे गुंतवणूक करण्यास टाळाटाळ करत आहेत. अनेक छोटे कारखाने तर बंदच पडले आहेत. तर मोठे कारखाने ठेका घेऊन काम करत आहेत.
Bangladesh Crisis 900 कारखान्यांना टाळं
बीजीएमई सूत्रांकडील माहितीनुसार बांग्लादेशात कापडाचे लहान मोठे मिळून जवळपास 800 ते 900 कारखाने मागील वर्षभरापासून बंद पडले आहेत. मोठे कारखाने तग धरून आहेत पण लहान आणि मध्यम आकाराचे कारखाने अडचणीत सापडले आहेत. जर अशीच परिस्थिती राहिली तर कारखान्यांची अवस्था आणखी खराब होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.