20.4 C
New York

Manoj Jarange Patil : जरांगे पाटलांचा फडणवीसांवर हल्लाबोल, म्हणाले…

Published:

जालना

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी गुरुवारी पुन्हा एकदा महायुती सरकारविरोधात दंड थोपटले. यावेळी त्यांनी 29 सप्टेंबरपासून पुन्हा उपोषणाला बसण्याची घोषणा केली. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धडा शिकवण्याचाही निर्धार व्यक्त केला. सरकारने 28 सप्टेंबरपर्यंत आरक्षण दिले नाही तर मी 29 सप्टेंबरपासून उपोषणाला बसेन. ही आरपारची लढाई आहे. यावेळी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची जिरवायची म्हणजे जिरवायचीच, असे जरांगे पाटील म्हणाले.

मनोज जरांगे यांच्या आरक्षणाच्या आंदोलनाला गुरुवारी 1 वर्ष पूर्ण झाले. यानिमित्ताने झालेल्या एका छोटेखानी बैठकीत मनोज जरांगे यांनी गुरुवारी दुपारी अचानक मराठा आरक्षणासाठी 29 सप्टेंबरपासून उपोषण सुरू करण्याची घोषणा केली. आपल्याला काही झाले तरी समाजाला आरक्षण मिळवून द्यायचे आहे. एक मेल्याने काही फरक पडत नाही. काळजी करू नका. माझे एक कुटुंब उघडे पडले तरी चालेल, पण समाजाचे लाखो कुटुंब मोठे झाले पाहिजेत. आपले उपोषण 29 सप्टेंबरपासून पुन्हा सुरू होईल.

मनोज जरांगे पाटील हे अंतरवली सराटीत आहेत. यावेळी मीडियाशी संवाद साधताना त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार निशाणा साधला. देवेंद्र फडणवीस यांनी गिरीश महाजन यांना हाताशी धरून आमच्यावर लाठीचार्ज घडवून आणला होता. गिरीश महाजन यांनी जालन्याताली काही भाजपचे नेते हाताशी धरले होते. देशात असा हल्ला झाला नाही एवढा हल्ला आमच्यावर झाला. एवढं घाण कृत्य फडणवीस यांनी केलं आहे. त्यांनी कुणालाही सोडलं नाही. सगळ्यांवर अन्याय केला आहे. त्यांनी कोणत्याही समाजावर अन्याय करायचं ठेवलं नाही. हा भाजप संपवणार तेव्हाच थांबेल. हा फक्त धमक्याच देत आहे, त्यांना 2024 ला दणका कळेल. थोडं थांबा, असा सूचक इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे.

माझ्या नादी लागू नका, मी बिघडलो तर पुरा सुफडा साफ करुन टाकेल, ग्रामपंचायत सदस्य सुद्धा तुम्हाला होऊ देणार नाही असं म्हणज मनोज जरांगे पाटील भाजप नेते रावसाहेब दानवे यांच्यावर हल्लाबोल केला. रावसाहेब दानवेंना मी चांगलं दादा म्हणत होतो. पण पडल्यापासून ते पिसळल्यासारखे करतायेत. मी पाडा म्हंटल असत तर लोकसभेला दानवे 3 लाख मतांनी पडले असते असेही जरांगे पाटील म्हणाले.

ओबीसी नेते एकत्र आले, समाज एकत्र आला नाही. छगन भुजबळ यांनी ही काडी लावली. त्यांना फक्त भांडणं लावता येतात. धनगरांसाठी भुजबळांनी एसटी प्रवर्गातून आरक्षण मागावे, ते प्रचंड जातीयवादी आहेत. त्यांना फडणवीस सांभाळत आहेत. आम्ही ओबीसींच्या विरोधात नाही, तेही आमच्या विरोधात नाही, असंही जरांगे पाटील म्हणाले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img