7.2 C
New York

Aaditya Thackeray : सुजाता सौनिक यांनी राजीनामा का द्यावा? आदित्य ठाकरेंचा प्रश्न

Published:

मुंबई

महिन्याभरापूर्वीच राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला अधिकारी मुख्य सचिवपदी बसण्याचा मान सुजाता सौनिक (Sujata Saunik) यांना मिळाला होता. राज्याच्या मुख्य सचिवपदी ज्येष्ठ आयएएस अधिकारी सुजाता सौनिक यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र आता सुजाता सौनिक यांच्या नियुक्तीवरुन राजकारण सुरु असल्याची चर्चा सुरु झाली आहे. कार्यकाळ संपण्याआधीच राज्य सरकार मुख्य सचिव सुजाता सौनिक यांना राजीनामा देण्यास भाग पाडत असल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे. गृह विभागाचे अप्पर मुख्य सचिव इकबाल सिंह चहल यांच्यासाठी राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव सुजाता सौनिक यांना हटवण्याच्या हालचाली मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर सुरू असल्याची चर्चा आहे. त्याच्याअनुषंगाने ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी महायुती सरकारवर (Mahayuti) जोरदार टीकास्त्र सोडले आहे. सुजाता सौनिक यांनी राजीनामा का द्यावा? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

देशात महिलांवर होत असलेल्या अत्याचाराच्या घटनांबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल, बुधवारी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. महिलांना मिळणाऱ्या अशा वागणुकीबाबत दुःख व्यक्त करतानाच, कोणत्याही गोष्टीला एक मर्यादा असते. त्यामुळे आता ही कृतीची वेळ असल्याचे त्या म्हणाल्या. त्याचा संदर्भ देत राज्याचे माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्वीट केले आहे. राष्ट्रपती मुर्मू यांनी, स्त्रियांना “दुर्बळ आणि कमी सक्षम” मानणाऱ्या मानसिकतेचा प्रतिकार करण्याविषयी भाष्य केले आहे. पण दुसरीकडे, महाराष्ट्रातील भाजपा-मिंधे सरकार मुख्य सचिव सुजाता सौनिक यांना त्यांचा कार्यकाळ संपण्यापूर्वीच राजीनामा देण्याच्या प्रयत्नात असल्याचे वृत्त आहे. जेणेकरून भाजपाला महाराष्ट्र लुटण्यास मदत करणाऱ्या त्यांच्या पसंतीच्या व्यक्तिला त्या जागी नियुक्त करता येईल, असा हल्लाबोल त्यांनी केला आहे.

महाराष्ट्रातील भाजप-मिंधे सरकार मुख्य सचिव, सुजाता सौनिक यांना त्यांचा कार्यकाळ संपण्यापूर्वीच राजीनामा देण्यास भाग पाडत आहेत. जेणेकरून भाजपला महाराष्ट्र लुटण्यास मदत करणाऱ्या त्यांच्या आवडत्यापैकी एकाला त्या पदावर नियुक्त करता येईल. सुजाता सौनिक यांनी कार्यकाळ संपण्यापूर्वी राजीनामा का द्यावा? फक्त बेकायदेशीर मुख्यमंत्री आणि भाजपला त्यांच्या लाडक्या ठेकेदारांना ठेका देणारा माणूस हवा आहे म्हणून? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी विचारला आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img