24.6 C
New York

ATS : गणेशोत्सवाआधीच पुण्यात ATS ची मोठी कारवाई

Published:

पुणे

राज्यात गणेशोत्सवाची (Ganeshotsav) धूम सुरु झाली आहे. लाडक्या बाप्पाला आणण्यासाठी सर्वजण आतुर झाले आहेत. सणासुदीचे दिवस असल्यामुळे राज्यातील पोलीस यंत्रणाही सज्ज झाली आहे. दहशतवादी विरोधी (ATS) पथकाने गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात (Pune) मोठी कारवाई केली आहे. छापेमारी करत कोंढवा परिसरातून एकाला ताब्यात घेतले आहेत. त्याच्याकडून तब्बल 3788 सिम कार्ड जप्त केले आहेत. त्याशिवाय लॅपटॉप अन् इतर साहित्यही ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी नौशाद अहमद सिद्धी (Naushad Ahmed Siddhi) याला ताब्यात घेतलं असून चौकशी सुरु आहे.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दहशतवाद विरोधी पथकाने पुण्यात मोठी कारवाई केली आहे. पुण्यातील कोंढवा परिसरात सुरू असलेल्या बनावट टेलिफोन एक्सचेंजवर दहशतवाद विरोधी पथकाने छापा टाकला आहे. या छाप्यात तब्बल 3788 सिम कार्ड, सात सिम बॉक्स, वाय फाय आणि सिम्बॉक्स चालविण्याकरता वापरण्यात येणारे अँटिना, लॅपटॉपसह मोठा मुद्देमाल दहशतवाद विरोधी पथकाने जप्त केलाय. विदेशातून भारतात येणारे इंटरनॅशनल कॉल भारतातील यंत्रणेला समजू न देण्यासाठी पुण्यातील कोंढव्यामध्ये बनावट टेलिफोन एक्सचेंज सेंटर सुरू होतं. दहशतवादी विरोधी पथकाने या कारवाईत नौशाद अहमद सिद्धी या 22 वर्ष तरुणाला ताब्यात घेतलं आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img