20.6 C
New York

Bigg Boss Marathi : अभिजीत सावंतने ‘बिग बॉस’चा नियम मोडला?

Published:

‘बिग बॉस मराठी’च्या घरातील (Bigg Boss Marathi) सदस्यांची रुपे कोणत्याही क्षणी बदलताना प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत. ‘बिग बॉस’च्या ट्रॉफीवर (Bigg Boss Marathi ) नाव कोरण्यासाठी सदस्य नवा प्लॅन बनवताना काही दिवसांपासून पाहायला मिळत आहे. आपली खेळी किती उत्तम आहे हे दाखवण्याचा सदस्यांचा प्रयत्न आहे. निक्की (Nikki) आणि अभिजीतची (Abhijit) जोडी सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. आता अभिजीत सावंतने ‘बिग बॉस’चा नियम मोडला का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

‘बिग बॉस मराठी’च्या घरातील (Bigg Boss Marathi New Promo) सदस्यांना दिलेल्या जोड्यांमध्येच फिरण्याचा आदेश बिग बॉसने दिला आहे. पण अभिजीत सावंत (Abhijit Sawant) एकटा फिरत असल्याने सूरज त्याला म्हणतोय,”अभि दादा आत बस”. अभिजीतला छोटा पुढारी म्हणतोय,”जोडीशिवाय फिरू शकत नाही”. त्यावर अभिजीतने थेट सुनावले आहे की,” मला बोलतील बिग बॉस’. त्यावर घन:श्याम म्हणतो,”पण तुम्ही नियम मोडू नका”. तर आर्या देखील अभिजीतच्या हालचालीवर म्हणते की, “तुम्ही तुमचे शब्द बोलताय की निक्कीचे. दोन दिवसांत अभिजीत सावंत पू्र्णपणे बदलला आहे” अभिजीत सावंतने खरचं नियम मोडला आहे का? अभिजीत सावंतला आता बिग बॉस काय शिक्षा देणार? असे अनेक प्रश्न प्रेक्षकांना पडले आहेत. या सर्व प्रेक्षकांची उत्तरे जाणून घेण्यासाठी आजचा भाग नक्की पाहा.

Bigg Boss Marathi निक्कीची सोलो पॉलिसी

अभिजीतसोबत बोलताना निक्की त्याला तिची मतं सांगते. जंगलाचा राजा एकटा बसतो तुला माहिती आहे ना आणि बाकीचे प्राणी नेहमी सोबत असतात. कारण ते राजासमोर एकटे जाऊ शकत नाहीत. निसर्गाची ही पॉलिसी आहे. गौतम गुल्हाटीच्या सीझनमध्ये सगळे जण त्याच्या विरोधात होते. पण तरीही तो त्या सीझनचा विजेता झाला. कारण घरातले सीन लोक त्यांच्या नजरेने पाहतात. पण प्रेक्षकांची नजर मात्र वेगळी असते. मी चुकीची नाही हे सांगण्याची मला गरज वाट नाही, असं निक्की म्हणताना दिसत आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img