26.5 C
New York

Supriya Sule : राजकोट किल्ल्यावर राणेंकडून ठेचून मारण्याची भाषा; सुप्रिया सुळेंनी थेट भरला सज्जड दम

Published:

राजकोट किल्ल्यावर कोसळलेल्या पुतळ्याची पाहणी करण्यासाठी गेलेल्या मविआ आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते एकमेकांशी भिडल्याचा प्रकार घडला. जवळपास दोन तास चालेल्या गदारोळानंतर आता आदित्या ठाकरे (Aditya Thackeray) आणि अन्य नेते राजकोट किल्यावरून बाहेर पडले आहेत. मात्र, या सर्व गदारोळावर खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आमच्या नेत्यांच्या केसालाही धक्काही लागला, तर याद राखा अस सज्जड इशारा सुळे यांनी दिला होता. (Supriya Sule On Rajkot Fort Political Clash)

Supriya Sule नेत्यांच्या केसालाही धक्का लागला तर…

राजकोट किल्ल्यावरील राड्यावर बोलताना सुळे म्हणाल्या की, आमचे सर्व नेते तिथे जाणार होते, हे सर्वांना माहिती होतं. त्यानंतरही तेथे एवढ्या मोठ्या प्रमाणात राडा होतो पोलीस यंत्रणा तिथे काय करतेय? पोलीस तिथे असूनही हा राडा कसकाय झाला? असा सवाल सुळेंनी विचारला आहे. या सरकारचं इंटेलिजन्स तोवर काय करतंय? आमचे नेते जयंत पाटील हे जाणार होते, हे पोलीस यंत्रणाला माहिती नव्हतं का? असा सवाल सुप्रिया सुळेंनी केला आहे.

ठाकरे गट अन् राणे समर्थक आमने-सामने; राजकोट किल्ल्यावर मोठा राडा

Supriya Sule घरात रात्रभर ठेचून एकेकाला मारुन टाकेन

खासदार नारायण राणेंनीही प्रतिक्रिया दिली. यापुढे आमचे पोलिसांना असहकार्य असेल. त्यांना येऊ दे. त्यांना आमच्या अंगावर यायला परवानगी द्या, मी एकेएकाला बघतो. घरात रात्रभर ठेचून एकेकाला मारुन टाकेन. कोणालाही सोडणार नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया नारायण राणेंनी दिली.

Supriya Sule कुठून झाली राड्याला सुरूवात

छत्रपती शिवाजी महाराज यांचा सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावर असलेला पुतळा कोसळल्यानंतर आज निषेध म्हणून महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून राजकोट किल्ल्यावर मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यानुसार मविआ नेते राजकोट किल्ल्यावर दाखल झाले होते. त्याचवेळी महायुतीचे नेते, माजी केंद्रीय मंत्री, खासदार नारायण राणे आणि माजी खासदार निलेश राणेदेखील राजकोट किल्ल्यावर पाहाणी करण्यासाठी दाखल झाले. मात्र, ठाकरे आणि राणे आमने-सामने आल्यानंतर कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी सुरू झाली. यावेळी कार्यकर्त्यांनी एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचाही प्रयत्न केला.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img