26.5 C
New York

Malvan Rajkot : ठाकरे गट अन् राणे समर्थक आमने-सामने; राजकोट किल्ल्यावर मोठा राडा

Published:

सिंधुदुर्ग मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा (Malvan Rajkot) कोसळल्यामुळे शिवप्रेमी संतप्त झाले. या मुद्यावरून विरोधी पक्ष सरकारला घेरले आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, विजय वडेट्टीवार, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष जयंत पाटील, माजी खासदार विनायक राऊत राजकोट किल्ल्यावर आले. आदित्य ठाकरे आले असताना नारायण राणे त्या ठिकाणी आले. त्यावेळी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला.

ठरल्याप्रमाणे महाविकास आघाडीचे नेते त्याठिकाणी पोहोचले. पण, त्यासोबतच महायुतीचे नेतेदेखील तिथे दाखल झाले. खासदार नारायण राणेंसह माजी खासदार निलेश राणे देखील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची पाहणी करण्यासाठी राजकोट किल्ल्यावर पोहोचले. कधीकाळी सहकारी असलेले आणि आता एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले ठाकरे आणि राणे आमने-सामने आले. त्यानंतर काही काळ राजकोट किल्ल्यावर तणावाचं वातावरण पाहायला मिळालं. दोन्ही पक्षांचे कार्यकर्तेय आपापसांत भिडले, त्यानंतर पोलिसांनी मध्यस्थी करत दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांना बाजूला केलं. त्यानंतर महाविकास आघाडीचे नेते किल्ल्याची पाहाणी करण्यासाठी निघून गेले.

शिवरायांचा पुतळा बनवणारा शिल्पकार जयदीप आपटे फरार

Malvan Rajkot पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर शांतता

छत्रपती शिवाजी महाराज यांचा मालवण किल्ल्यावरील पुतळा कोसळला होता. त्यानंतर नारायण राणे, नितेश राणे बुधवारी पाहणी करण्यास आले. त्याचवेळी आदित्य ठाकरे दाखल झाले. भाजप आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आमनेसामने आले. दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरु केली. त्यामुळे तणाव निर्माण झाला. पोलिसांनी या ठिकाणी बॅरीकेटींग केले. तसेच दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना शांत केले. भाजपचे कार्यकर्ते राजकोट किल्ल्यावर जाण्याचा प्रयत्न करत आहे.

Malvan Rajkot आदित्य ठाकरे यांचा भाजपवर घणाघात

भाजपच्या लोकांनी या ठिकाणी चोरी केली, हे आमच्या अकालनपलीकडे आहे. जगभरात अनेक पुतळे उभारले गेले आहेत. ते सर्व सुव्यवस्थित आहे. परंतु भाजपने आपल्या ठेकेदारांना हे काम देऊन यात चोरी केली, असा आरोप शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी केली. जूनमध्ये डागडुजीसाठी पत्र गेले होते, अशी माहिती समोर आली आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img