20.4 C
New York

Shivaji Maharaj Statue : शिवरायांचा पुतळा बनवणारा शिल्पकार जयदीप आपटे फरार

Published:

छत्रपती शिवाजी महाराजांचा ब्राँझचा पुतळा (Shivaji Maharaj Statu) eकोसळल्याची घटना नुकतीच घडली. याप्रकरणी या पुतळ्याचा शिल्पकार जयदीप आपटे आणि स्ट्रक्टचरल इंजिनिअर चेतन पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावरील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अवघ्या आठ महिन्यांपूर्वी लोकार्पण करण्यात आलं होत. (Shivaji Maharaj statue) या दोघांनाही लवकरच अटक होण्याची शक्यता आहे. यापैकी शिल्पकार जयदीप आपटे घराला टाळं लावून फरार झाला आहे. प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी जयदीप आपटेच्या घरी गेले तेव्हा त्याच्या घराला कुलूप होतं.

Shivaji Maharaj Statue फरार झाला

जयदीप आपटे याला भारतीय नौदलाकडून फारसा अनुभव नसतानाही छत्रपती शिवाजी महाराजांचा राजकोट किल्ल्यावरील 28 फुटांचा ब्राँझचा पुतळा उभारण्याचं काम देण्यात आलं होतं. जयदीप आपटेने अवघ्या सहा ते सात महिन्यांमध्ये शिवरायांचा हा पुतळा तयार केला होता. कोणताही अनुभव नसताना जयदीप आपटेला इतकं मोठं काम का दिलं हा प्रश्न आता निर्माण झाला आहे. त्यामुळे जयदीप आपटे याला नेमक्या कोणत्या निकषांच्याआधारे शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याच काम देण्यात आलं, असा सवाल अनेकजण उपस्थित करत आहे. या घटनेमुळे राज्यभरातील शिवप्रेमींकडून संताप व्यक्त केला जात आहे.

महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर निलेश राणेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

Shivaji Maharaj Statue कोण आहे जयदीप आपटे?

जयदीप आपटे हा कल्याणमध्ये राहायला आहे. कल्याणमधील त्यांच्या शाळेच्या रस्त्यावरच शिल्पकार सदाशिव साठे यांचा स्टुडिओ आहे. त्यांच्या प्रभावामुळे आठवीत शिकत असतानाच जयदीपने कला क्षेत्रात जाण्याचा निर्णय घेतला होता. त्याचं मूळ गाव कल्याण असून आई-वडील दोघेही नोकरी करायचे. जयदीप आपटेचे दहावीपर्यंतचं शिक्षण सुभेदार वाडा हायस्कूलमध्ये झालं. त्यानंतर रहेजा स्कूल ऑफ आर्टमधून कमर्शियल आर्टची पदविका व नंतर जे जे स्कूल ऑफ आर्टमधून शिल्पकलेचा डिप्लोमा त्यांनी केला होता.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img