आज सकाळपासून एक्स (पूर्वीचे ट्वीटर) (X down) अचानक डाऊन झाले आहे. (Down) भारतातील अनेक वापरकर्त्यांना याची समस्या जाणवत आहे. त्याचबरोबर अमेरिका, कॅनडा आणि ब्रिटनचाही समावेश आहे. या प्रकारानंतर लोकांनी तक्रार करण्यास सुरुवात केली आहे. इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर याविषयी लोक तक्रार नोंदवत आहेत. एकट्या अमेरिकेत डाउन डिटेक्टरवर 36,500 तक्रारी आल्या आहेत असं रॉयटर्सने म्हटलं आहे. याशिवाय कॅनडामध्ये 3300 आणि इंग्लंडमध्ये 1600 तक्रारी आल्या आहेत. यावरून जागतिक स्तरावर ट्वीटर डाऊन झाल्याचं समोर आलं आहे. त्याचा परिणाम भारतातही दिसून आला आहे. भारतातील अनेक लोकांना या समस्या जानवत आहेत. त्याबाबत लोक आपली मत व्यक्त करत आहेत.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आउटेजच्या अनेक तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत. भारतातील अनेक वापरकर्त्यांना X ऍक्सेस करण्यात आणि वेब आणि ॲप दोन्ही वर्जनवर रिफ्रेश करण्यात अडचणी निर्माण होत आहेत. याबाबत DownDetector ने माहिती दिली आहे. DownDetector.in हे एक प्लॅटफॉर्म आहे जे रिअल टाइममध्ये वेबसाइट्स आणि ऑनलाइन सेवांच्या आउटेजचा मागोवा घेते. त्यानुसार दिल्ली, कोलकाता, नागपूर, कटक, मुंबई, हैदराबाद, बेंगळुरू आणि चेन्नईमध्ये लोकांना X डाऊनच्या समस्येचा मोठ्या प्रमाणात सामना करावा लागत आहे. शिवाय पाटणा, लखनौ, जयपूरसह अनेक शहरांमध्ये देखील लोकांनी X आउटेज नोंदवले आहे.
DownDetector च्या मते, 70% लोकांना ॲप कनेक्शनमुळे समस्या येत आहेत. तर 27% लोकांना वेब ऍक्सेस करण्यात समस्या येत आहेत आणि सुमारे 3% लोकांनी सर्व्हर कनेक्शनमध्ये समस्या येत आहेत. युजर्सना पोस्ट अपलोड करताना अडचणी येत आहेत. ते त्यांच्या खात्यांवरील पोस्ट पाहू शकत नाहीत. वापरकर्त्यांना काहीतरी चूक झाल्याच्या चेतावणी दिसत आहेत आणि पेज रीलोड करण्याचा प्रयत्न करा, असं सांगितलं जात आहे. मात्र रीलोड केल्यानंतर देखील युजर्सना पोस्ट अपलोड करताना अडचणी येत आहेत.