17.6 C
New York

Deepak Kesarkar : क्रेन , हुक, सेफ्टी बेल्ट पुरवा गोविंदाची सुरक्षा पालिकेची जबाबदारी ; पालकमंत्र्यांचे आदेश

Published:

Deepak Kesarkar:मंगळवारी सरावासह गोविंदा पथकांना क्रेन , हुक, सेफ्टी बेल्ट पुरवावेत असे आदेश पालकमंत्री दीपक केसरकर यांनी मुंबई पालिका प्रशासनाला दिलेत. मुंबई महापालिका गणेशोत्सवासाठी एवढा खर्च करते तर दहीहंडी उत्सवासाठी खर्च करण्यास काय हरकत आहे?अशी भूमिका दीपक केसरकर यांनी घेतली आहे. उंच मानवी थर आणि दहीहंडी ही मुंबईची ओळख आणि संस्कृती आहे. ही आपली ओळख टिकावी म्हणून, जिल्हा विकास नियोजन विभागातून प्रो – गोविंदासाठी दोन कोटींचा निधी देण्यात आला.मंगळवारी दहीहंडीच्या दिवशी गोविंदा पथकांना हि सेवा पुरवावी, असे निर्देश त्यांनी दिलेत.

दोन – तीन थरांवर असलेल्या सर्वात वरच्या गोविंदाच्या सुरक्षेसाठी ह्या उपाययोजना कराव्यात, तसच या दिवशी कोणती दुर्घटना घडून जीवितहानी होऊ नये, म्हणून सुरक्षेच्या दृष्टीने ह्या उपाययोजना म्हणून हा खर्च करावा, असे दीपक केसरकर म्हणाले, हे पहिलेच वर्ष असून कशा प्रकारे आणि कित्ती क्रेन पूरवता येतील याचा विचार करावा . व जास्तीत जास्त मंडळांना पुढच्या वर्षी क्रेन आपलयाला कशा पोहचवता येतील याचा विचार करण्याचे आदेश केसरकर यांनी पालिका प्रशासनाला दिले आहेत.

‘दादा’ म्हणत उद्धव ठाकरेंना ‘लाडक्या बहिणी’चे पत्र, राजकारणात खळबळ

स्वतःची काळजी घेणे आवश्यक,

मानवी थर रचताना दहीहंडीच्या वेळी अपघात होत असतात. असंख्य गोविंदा आणि सहभागींना दहीहंडीच्या वेळी फ्रॅक्चर आणि मेंदूच्या दुखापतीचा सामना करावा लागतो. मागच्या वर्षी सर्वाधिक जास्त २०० हुन अधिक जखमी आणि तिघांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. या स्पर्धेच्या चढाओढीमध्ये गोविंदा पथकांना सततच्या दबावामुळे धोका पत्करावा लागतो. यावेळी मनगटावर संरक्षणात्मक बँड वापरणे, डोक्याच्या सुरक्षेसाठी हेल्मेट वापरणे, कोपरावर पॅड वापरणे त्याचबरोबर स्ट्रेचिंग आणि स्ट्रेंथ ट्रेनिंग करणे आवश्यक आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img