26.5 C
New York

Jay Shah : जय शाहनंतर कोण होणार बीसीसीआय सचिव ? ‘या’ नावांची चर्चा

Published:

बीसीसीआय सचिव जय शाह (Jay Shah) आयसीसीचे (ICC) नवीन अध्यक्ष होणार असल्याची चर्चा सध्या सुरु आहे. माहितीनुसार, जय शाह यांना 16 पैकी 15 सदस्यांनी पाठिंबा दिला आहे त्यामुळे बीसीसीआय सचिव जय शाह आयसीसीचे नवीन अध्यक्ष होणार हे निश्चित झाले आहे . त्यामुळे त्यांच्या जागी बीसीसीआयचे नवीन सचिव कोण होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. आयसीसीच्या नवीन अध्यक्ष पदासाठी नामांकन करण्याची अंतिम तारीख 27 ऑगस्ट आहे. 1 डिसेंबर रोजी आयसीसीचे नवे अध्यक्ष पदभार स्वीकारणार आहे. त्यामुळे जर जय शाह आयसीसीचे नवे अध्यक्ष झाले तर बीसीसीआयमध्ये (BCCI) त्यांची जागी कोण उमेदवार आहेत ते जाणून घेऊया.

Jay Shah राजीव शुक्ला

बीसीसीआयचे सचिव पदासाठी बीसीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला (Rajeev Shukla) यांच्या नावाची सर्वात जास्त चर्चा आहे. बीसीसीआयकडून त्यांना एक वर्षासाठी या पदावर कार्यभार मिळू शकते.

मनू भाकर सूर्यकुमार यादवकडून शिकते क्रिकेट

Jay Shah आशिष शेलार

या शर्यतीत दुसरं नाव भाजपचे दिग्गज नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांचा आहे. आशिष शेलार सध्या बीसीसीआयचे खजिनदार आणि एमसीए प्रशासनातील मोठे नाव आहे. मात्र आशिष शेलार बीसीसीआयचे सचिव पद स्वीकारणार का? याबाबत देखील अनेक चर्चा सध्या सुरु आहे.

Jay Shah अरुण धुमाळ

अरुण धुमाळ यापूर्वी बीसीसीसीआयचे खजिनदार राहिले आहे. त्यांच्याकडे बोर्ड चालवण्याचा आवश्यक अनुभव देखील आहे. बीसीसीआयला धुमाळ आणि शुक्ला यांच्यातील स्थान बदलणे सर्वात सोपा पर्याय आहे मात्र बीसीसीआय अनेकदा अशी नावे पुढे ठेवते ज्याची कोणी कल्पनाही करू शकत नाही. यांच्यासोबतच रोहन जेटली, अविशेक दालमिया, दिलशेर खन्ना, विपुल फडके आणि प्रभातेज भाटिया यांच्या नावाची देखील चर्चा सध्या सुरु आहे. बीसीसीआयच्या एका माजी सचिवाने दिलेल्या माहितीनुसार, बीसीसीआय नेहमी त्या लोकांना संधी देते जे लोक यापूर्वी सिस्टिममध्ये राहिले असते.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img