15.6 C
New York

Sharad Pawar : पंढरपूरात शरद पवार गटाला मिळणार बळ…?

Published:

विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Election) पार्श्वभूमीवर उमेदवारीसाठी इच्छुक राजकीय नेत्यांकडून नव्या पर्यायांचा शोध घेतला जात आहे. भाजप नेते समरजितसिंह घाटगे (Samarjit Singh Ghatge) यांनी भाजप साथ सोडून तुतारी हातात घेण्याचा निर्णय घेतला. आता पंढरपुरातील आणखी एक नेता शरद पवार यांच्या गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे. भगीरथ भालके (Bhagirath Bhalke) यांनी आज पुण्यात शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली. या भेटीमुळं भगीरथ भालके घरवापसी करण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जातं. स्वत: भालकेंनी त्याचे संकेत दिलेत.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भगीरथ भालकेंनी आज शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये अर्धा ते पाऊण तास चर्चा झाली. या भेटीत पंढरपूर मतदारसंघाबाबत चर्चा झाली. तसेच भालके यांनी पवारांकडे तिकिटाची मागणीही केली आहे. त्यामुळे ते लवकरच शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली. पवारांची भेट घेतल्यानंतर भालके म्हणाले की, मी आगामी विधानसभा निवडणूक लढवणार आहे. हे जिल्ह्यातील सर्व जनतेला माहिती आहे. लवकरच येणाऱ्या काळात सर्व गोष्टी स्पष्ट होतील. महाविकास आघाडीकडून मला लढण्याची इच्छा आहे. त्यावर साहेबांशी बोलणं झालं, अशी माहिती त्यांनी दिली.

मोदींच्या दौऱ्यावर खडसेंचा बहिष्कार?

पुढं ते म्हणाले, लोकसभा निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवारांचे आम्ही भक्कमपणे काम केलं. आमच्या भागातून मताधिक्य देण्याची भूमिका आम्ही पार पाडली. त्यामुळं पंढरपूर मतदारसंघातून मविआकडून मी उमेदवारीसाठी आग्रही आहे. माझा शरद पवार नक्कीच विचार करतील. मी आगामी निवडणूक लढवणार आहे. भालकेंनी सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करून निर्णय घेऊ, असं आश्वासन पवारांनी दिल्याचं सांगितलं.

Sharad Pawar भगीरथ भालके कोण आहेत?

भारत भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक झाली होती. त्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीकडून भगीरथ भालकेंना उमदेवारी मिळाली होती. मात्र त्यांचा भाजपच्या समाधान आवताडेंनी पराभव केला होता. भगीरथ हे विठ्ठल सहकारी कारखान्याचे चेअरमन आहे. कारखान्यासाठी त्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांकडे मदत मागितली होती. मात्र त्यांना कोणतीही मदत मिळाली नाही. त्यामुळे नाराज होऊन त्यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली होती. त्यानंतर लगेच त्यांनी तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या बीआरएस पक्षात प्रवेश केल होता.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img