19.4 C
New York

Pune Traffic : दहीहंडीमुळे पुण्यात वाहतुकीत बदल; जाणून घ्या पर्यायी मार्ग

Published:

पुणे

पुणे शहरात मंगळवारी विविध भागात दहीहंडी (Dahihandi) उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्ताने पुणे पोलिसांनी चोख खबरदारी घेतली असून, शहरातील मध्यभागातील वाहतूकीत बदल (Pune Traffic) करण्यात आला आहे. वाहन चालकांना पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या मार्गांचा वापर करावा, असे आवाहन पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी केले आहे.

दहीहंडीनिमित्त मंडळांकडून जय्यत तयारी सुरू आहे. शिवाजी रस्ता, लक्ष्मी रस्ता, बाजीराव रस्ता, टिळक रस्ता परिसर, बुधवार चौक ते दत्तमंदिर चौक, बेलबाग चौक ते सेवासदन चौक, बुधवार चौक ते अप्पा बळवंत चौक, मंडई चौक ते (बाबू गेनू चौक), साहित्य परिषद चौक या ठिकाणी सायंकाळपर्यंत मोठ्या प्रमाणात गर्दी असते. बाळगोपाळ यांच्यासोबतच दहीहंडी उत्सवासाठी पुणेकर मोठी गर्दी करत असतात. त्यामुळे वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून वाहतूक व्यवस्थेत सायंकाळी पाचपासून बदल करण्यात येणार आहे. त्यामुळे वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन केले आहे.

असा आहे बदल….

शिवाजी रस्त्यावरुन स्वारगेटला जाण्यासाठी, स. गो. बर्वे चौकातून जंगली महाराज रस्त्याने खंडोजी बाबा चौक, टिळक चौक-पुढे टिळक रस्ता, शास्त्री रस्त्याने इच्छितस्थळी जावे.

पुरम चौकातुन बाजीराव रस्त्यावरून शिवाजीनगरकडे जाण्यासाठी पुरम चौकातुन टिळक रस्त्याने टिळक चौक व पुढे गोपाळ कृष्ण गोखले रस्त्याने (फग्युर्सन) इच्छित स्थळी जावे. तसेच पुरम चौकातून सेनादत्त चौकाकडे व पुढे इच्छित स्थळी जाता येईल.

स. गो. बर्वे चौकातून पुणे मनपा भवनकडे जाण्यासाठी : स. गो. बर्वे चौकातून जंगली महाराज रस्त्याने- झाशी राणी चौक डावीकडे वळून इच्छितस्थळी जावे.

बुधवार चौकाकडुन आप्पा बळवंत चौकाकडे एकेरी वाहतूक सुरू राहील. अप्पा बळवंत चौकातून बुधवार चौकाकडे येणारी वाहतूक बाजीराव रस्त्याने सरळ सोडली जाईल.

रामेश्वर चौक ते शनिपार चौकाकडे येणारी वाहतूक बंद राहील.

सोन्या मारुती चौकाकडून लक्ष्मी रस्त्याने सरळ सेवासदन चौकाकडे वाहतुकीकरिता बंद करण्यात आला आहे. वाहने सोन्या मारुती चौकातून उजवीकडे वळून फडके हौद चौकातून इच्छित स्थळी जातील.

शिवाजी रस्त्याने जिजामाता चौकातून गणेश रस्त्याने दारुवाला पुलाकडे जाणारी वाहतूक ही गाडगीळ पुतळा येथून डाव्या बाजूने कुंभारवेस चौक- पवळे चौक- जुनी साततोटी पोलीस चौकी मार्गे इच्छितस्थळी जाता येईल.

गणेश रस्त्यावरील संपूर्ण वाहतूक ही दारुवाला पुल येथून बंद राहील. तसेच, देवजीबाबा चौक व फडके हौद चौकात वाहतूक बंद करण्यात येईल. वाहनचालकांनी अपोलो टॉकिज, नरपतगिरी चौक, दारुवाला पूल, दुधभट्टी या मार्गाचा वापर करावा.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img